Michael Lobo Dainik Gomantak
गोवा

Michael Lobo: गैरकृत्यांवर आळा न घातल्यास पर्यटन व्यवसाय धोक्यात; आमदार लोबो म्हणाले थेट मुख्यमंत्र्यांना...

दैनिक गोमंतक

बेकायदेशीर कृत्यांवर आळा घालण्यासाठी गोवा सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी पोलिस प्रशासन देखील सक्रीय झाले आहे. याच मुद्यावरुन आज कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी स्थानिक पंचाची भेट घेतली. व वाढत्या बेकायदेशीर कृत्यांवर चर्चा केली.

(Calangute MLA Michael Lobo along with panch members meet CM Sawant over tourism-related issues)

मिळालेल्या माहितीनुसार आज कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी कळंगुट समुद्र किनाऱ्यांवरील वाढत्या गैरकृत्यांवरुन स्थानिक पंच सदस्यांशी चर्चा केली. यावेळी लोगो म्हणाले की, अनेक ठिकाणी पर्यटकांची दलालांकडून फसवणूक होत असल्याचे प्रकार सुरु आहेत. तर काही ठिकाणी अवैधरीत्या व्यवसाय थाटल्याचे प्रकार समोर येत आहेत. याचा पर्यटकांवर आणि पर्यटन व्यवसायांवर अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शाश्वत उपाय योजने आश्यक आहेत. अन्यथा याप्रकारामुळे सर्वच व्यवसाय धोक्यात येतील अशी भीती लोबो यांनी व्यक्त केली.

आमदार लोबो म्हणाले की, या प्रश्नावरुन आपण मुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा करणार आहोत. तसेच या समस्या सोडवण्यासाठी शाश्वत उपायाबाबत चर्चा करणार आहोत. काही ठिकाणी ध्वनी प्रदूषणाचे प्रकार समोर येत आहेत. यावर उपाय योजले जाणार आहेत. मात्र स्थानिक नागरीकांनी देखील नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. यामुळे काही समस्या कमी होतील. आणि प्रशासनाला हा प्रश्न हाताळणे अधिक सोपे होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT