Goa Church: धक्कादायक! चर्चच्या जमिनीवर कब्‍जा करुन बेकायदेशीर बांधकाम

Cortalim: चर्चच्या जमिनीवर कब्‍जा अन् झाडांची कत्तल करून बांधकामे करण्यात आली; त्या विरोधात धर्मगुरुंनी ग्रामस्‍थांना साद घातली आहे.
Cortalim
CortalimDainik Gomantak
Published on
Updated on

cortalim: कुठ्ठाळी चर्चच्या ‘इग्रज द कुठ्ठाळी’ व ‘फाबरिका द कुठ्ठाळी’ या सर्व्हे क्रमांक 167/2 या कोनसुवा येथील जमिनीवर अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या बेकायदा बांधकामावर त्‍वरित कारवाई करण्यात यावी यासाठी कुठ्ठाळी चर्चच्या परिसरात आज रविवारी संध्याकाळी जाहीर सभेचे आयोजन करण्‍यात आले होते. चर्चचे फादर डॉ. सिमांव आर. दिनिज यांच्‍या मार्गददर्शनाखाली झालेल्‍या या सभेला ग्रामस्‍थ मोठ्या संख्‍येने उपस्‍थित होते.

यावेळी फादर दिनिज म्हणाले की, कुठ्ठाळी चर्चच्या मालकीची सर्व्हे क्रमांक 167/2 बीमध्ये एकूण 56 हजार चौरस मीटर जमीन आहे. त्‍यातील कोनसुवा येथे बेकायदेशीरपणे डोंगर कापण्यात आला असून मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल करण्‍यात आली आहे.

तसेच बेकायदेशीर कुपनलिकांची खोदाई, पावसाळ्यात पाण्याचा निचरा होणारे ओहोळ बुजवून रस्त्यांचे बांधकाम आदी प्रकार सुरू आहेत.

पंचायतीचे तक्रारींकडे दुर्लक्ष

  • कुठ्ठाळी पंचायतीला 28 मे, 7 जून, 30 जून, 5 जुलै, 3 ऑक्‍टोबर, 26 नोव्हेंबर, 29 नोव्‍हेंबर अशी सातवेळा पत्रे पाठवूनसुद्धा काहीच कारवाई करण्‍यात आलेली नाही. या प्रकारांविरोधात योग्य कारवाई करण्यात यावी म्हणून मुरगाव गटविकास अधिकारी कार्यालयातून पत्र आले.

  • तसेच दक्षिण गोवा पंचायत संचालनालयकडून तात्‍काळ कारवाई करण्‍याचा आदेश असताना देखील पंचायत सचिव व सरपंचाने काहीच दखल घेतली नाही, असा आरोप फादर दिनिज यांनी केला.

  • तसेच आवश्‍‍यक ते जमिनीचे सर्व कागदपत्र देऊन वेर्णा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. मात्र पोलिसांकडून काहीच कारवाई करण्यात आली नाही. यामुळेच सर्व सरकारी यंत्रणा सपशेल कुचकामी ठरल्याचे स्‍पष्‍ट होत आहे, अशी घणाघाती टीकाही त्‍यांनी केली.

Cortalim
Zuari Bridge Traffic : कुठ्ठाळीतील वाहतूक कोंडीवरुन युरी आलेमाव यांनी सरकारला धरलं धारेवर; म्हणाले...

ग्रामस्‍थांना विचारले तीन महत्त्‍वपूर्ण प्रश्‍‍न

फादर दिनिज यांनी उपस्थित जनसमुदायाला तीन प्रश्न उपस्थित विचारले. तुमचे मत काय?, तुम्हाला काय वाटते? आता आम्ही काय करावे?. या जमिनीवर 122 जणांची नावे सूचित केली असून याबाबतचे सेल डीड कोणी केले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या सत्य लवकरच बाहेर येईल, असेही ते म्‍हणाले.

चर्चच्‍या जमिनीवर करण्यात आलेले अतिक्रमण कायदेशीर मोडून काडले पाहिजे असा आग्रह यावेळी उपस्थित कुठ्ठाळीचे आमदार आंतोन वाझ, जुझे मारी, फादर मिरांडा, थॉमस गामा, ओलान्‍सियो सिमॉईश, रेमंड डिसा, सरपंच सोनिया परेरा, कॅनडी डिसिल्वा या सर्वांनी धरून तसा ठराव संमत केला.

चर्चच्‍या जमिनीवर अतिक्रमण झाल्‍याविरोधात आपण कुठ्ठाळी पंचायत, दक्षिण गोवा पंचायत संचालनालय, राज्यपाल, नगरनियोजन, वन खाते, जलसंधारण खाते, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, मंत्री मिळून 45 तक्रारवजा पत्रे पाठवून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. पण कोणतीच कारवाई झालेली नाही. -फा. सिमांव दिनिज, कुठ्ठाळी चर्चचे धर्मगुरु

ना विकास क्षेत्र : अधोरेखित असूनही येथे ईशान आयसीसी (घरक्रमांक (104/2), सतीश दुभाळ (घरक्रमांक 104/23), नीळकंठ लमाणी (घरक्रमांक 104/24), प्रेमा नाईक (घरक्रमांक 124/4), कृष्णा रेवाप्पा लमाणी (घरक्रमांक १२४/७) व अन्‍य बेकायदेशीर बांधकामे करण्‍यात आली आहेत.

याबाबत आपण कुठ्ठाळी पंचायत, दक्षिण गोवा पंचायत संचालनालय, राज्यपाल, नगरनियोजन, वन खाते, जलसंधारण खाते, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, मंत्री मिळून 45 तक्रारवजा पत्रे पाठवून कारवाईची मागणी केल. पण उपयाेग झाला नाही, असे फादर दिनिज म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com