Goa crime news Dainik Gomantak
गोवा

Illegal Spa Goa: थेट पंच सदस्यांनाच विचारलं ''लडकी चाहीये क्या?" कळंगुटमधील बेकायदेशीर मसाज पार्लरवर छापा; 5 महिलांची सुटका

Calangute massage parlour raid: हे ‘मसाज पार्लर’ एका रात्रीत त्या जागी अस्तित्वात आलेले नसून अनेक महिन्यांपासून कार्यरत असल्याची माहिती कळंगुटचे माजी उपसरपंच सुदेश मयेकर यांनी दिली

Akshata Chhatre

कळंगुट: कळंगुट येथील एक ‘मसाज पार्लर’ पोलिसांनी ‘पिंक फोर्स’च्या मदतीने रातोरात बंद केलं आणि इथून पाच महिलांची सुटका करण्यात आली. कळंगुट पंचायतीचे विद्यमान पंच सदस्य सप्नेश वायंगणकर यांनी यावेळी कळंगुट पोलिसांच्या सहकार्याने महत्त्वाची भूमिका बजावली.

मुख्यमंत्र्यांचा फोन आला म्हणून परवानगी दिली

एका स्थानिक महिलेने दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेल्या मालकाकडे हा व्यवसाय चालवण्याचा कुठलाही वैध परवाना नाही, मग अशा स्थितीत एका बड्या माणसाची मदत मिळाल्याशिवाय असा व्यवसाय चालणं शक्यच नाही.

गोव्यासाठी पर्यटन फार महत्वाचं आहे, मात्र अशा घटनांमुळे राज्यातील पर्यटनाला फटका बसतोय. संबंधित अधिकारी प्रश्न केलेल्या वेळी मुख्यमंत्र्यांचा फोन आला म्हणून परवानगी दिल्याची सबब देतात, पण जर का यामध्ये खरोखर मुख्यमंत्र्यांचा हात असेल तर त्यांनी खुशाल असे व्यवसाय त्यांच्या मतदारसंघात सुरू करावेत असं ती संतप्त महिला म्हणाली आहे.

कळंगुट पंचायतीचे विद्यमान पंच सदस्य सप्नेश वायंगणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना कळंगुट येथील खोब्रावाडा या भागात असा बेकायदेशीर व्यवहार सुरू असल्याची माहिती मिळाली. माहिती हाती लागताच त्यांनी गोव्यातील पिंक फोर्सला पाचारण केले.

पोलिसांनी चौकशी करताना व्यवसायाच्या मालकाजवळ कोणतेही परवाने सापडलेले नाहीत, किंवा पंचायतीजवळ त्यांनी परवान्यासाठी अर्ज केलेला नाही. मसाज पार्लर सुरू झालेल्या दिवशीच पंचायतीने याला टाळा ठोकलाय.

पंच सदस्यांना विचारलं ''लडकी चाहीये क्या?"

पंच सदस्य सप्नेश वायंगणकर यांनी स्वतःचा अनुभव माध्यमांना सांगितला, ते म्हणाले की असा व्यवसाय चालवणारी लोकं केवळ पैशांसाठी व्यवहार करतात, त्यांना समोर कोण उभं आहे याचं भान नसतं. जर का आणखीन कोणाला असा अनुभव आल्यास त्यांनी पोलिसांची मदत घ्यावी, पोलिस कायमच मदत करण्यासाठी तत्पर असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची लागणार लॉटरी? मूळ वेतनात 400 टक्क्यांपर्यंत वाढीचा फॉर्म्युला; रेल्वे संघटनेच्या प्रस्तावाने उडवली खळबळ

Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन 150 वर्षे जिवंत राहणार? रशियन शास्त्रज्ञांच्या दाव्यानं जगभरात खळबळ; प्रयोगशाळेत तयार केले जातायेत मानवी अवयव

घर सुटलं, देश सुटला अन् आता आयुष्यही संपलं! पाकिस्तानातून मायदेशी परतणाऱ्या अफगाण निर्वासितांचा ट्रक उलटला; 18 मृत्यू, 35 जखमी

पूजेसाठी निघाले, पण वाटेतच काळाने गाठले! मध्य प्रदेशात भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली दरीत उलटली; 6 जणांचा मृत्यू, 40 जखमी

Priti Yog 2026: वादविवाद संपणार, बँक बॅलन्स वाढणार! 3 राशींची लॉटरी लागणार; 8 जूनपासून सुरु होतोय अत्यंत दुर्मिळ 'प्रीति योग'

SCROLL FOR NEXT