Calangute Crime Arrest  Dainik Gomantak
गोवा

Calangute Crime: कळंगुटमध्ये शॅकवाल्यांना दादागिरी भोवली; पंचसदस्यांसह पाच जणांना 5 दिवसांची कोठडी

Mumbai Tourist Assault In Calangute: पोलिसांनी अटक केलेल्या सहा संशयितांना शनिवारी म्हापसा न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली

Akshata Chhatre

कळंगूट: जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच कळंगुट येथून एक धक्कादायक बातमी समोर आली होती. कळंगुट येथे पुन्हा एकदा पर्यटकांना निशाणा बनवण्यात आले. ये प्लॅनेट गोवा शॅकवर मुंबईहून आलेल्या पर्यटक आणि शॅक कामगार यांच्यात शुक्रवारी (३ जानेवारी) पहाटे ३ वाजता झालेल्या वादावादीत एक पर्यटक गंभीर जखमी झाला, या प्रकरणात स्थानिक पंच सदस्यासह पाच जणांना पोलिसांनी अटक करण्यात आली होती. पोलिसांनी अटक केलेल्या सहा संशयितांना शनिवारी म्हापसा न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे गेल्या सप्टेंबरमध्ये याच शॅकमध्ये गुजरातच्या पोलिसाला मारहाण झाली होती. नौफाल पी. टी. (२८ केरळ), रोहित कुमार (२७), अभिषेक कुमार (२४), विनोद कुमार (३१), सुरिंदर कुमार (२८) अशा चारही हिमाचल प्रदेशमधील आरोपींना अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत.

दरम्यान, कळंगुटमध्ये (Calangute) गेल्या काही दिवसांत मारहाणीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी, येथेच किनाऱ्यावरील 'मरीना बीच' शॅकमध्ये जेवणाच्या ऑर्डवरुन आठ जणांचा पर्यटकांचा गट आणि शॅक मालक यांच्यात झालेल्या वादातून एका पर्यटकाचा खून झाला होता. बोल्लारवि तेजा असे पीडित पर्यटकाचे नाव होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Municipal Election: पालिका प्रभागरचनेची घाई; सरकार-निवडणूक आयोग आमनेसामने, '24 तासांत काम कसे करणार?'

Goa Crime: 11 वर्षे शौचालयाखाली दडले होते खुनाचे रहस्य; खोदकामात सांगाडा सापडला, अखेर पुराव्याअभावी संशयित निर्दोष

Rohit Sharma: 'मला घरी बोलावलं, अर्धा तास माझ्यासोबत...' रोहित शर्माबाबत स्टार क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य; सांगितली संपूर्ण कहाणी

GST Collection: गोव्यात पाच महिन्यांत 1,143 कोटींचा जीएसटी जमा; 20,960 सक्रिय करदाते, कॅसिनोंबाबतही मोठी स्पष्टता

Team India ODI Series: 2027 वनडे वर्ल्ड कपआधी टीम इंडियाची अग्निपरीक्षा! न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिकेसह 'या' संघांविरुद्ध होणार सामने; पाहा संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT