Baga Lane 
गोवा

Calangute Baga: उत्तर गोव्यातील प्रसिद्ध भाग दाखवला रेड लाईट एरिया; Youtuber ने हात जोडून मागितली माफी

Viral Video: रजकचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी प्रितिक्रिया देण्यास सुरुवात केली. भागाची नाहक बदनामी केली जात असल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला.

Pramod Yadav

म्हपसा: गोव्याबाबत अनेक गैरसमज लोकांमध्ये प्रचलित आहेत. विशेषत: देशी पर्यटकांमध्ये गोव्याचे जेवढे आकर्षण आहे तेवढ्याच्या चुकीच्या समजुती घेऊन ते पर्यटनासाठी येतात. गोव्यातील विविध भाग, बीच, ऐतिहासिक ठिकाणे, इव्हेंट आणि संगीत कार्यक्रमाचे व्हिडिओ प्रसिद्ध केले जातात. दरम्यान, एकाने गोव्यातील प्रसिद्ध भाग चक्क रेड लाईट एरिया म्हणून दाखवला.

Youtuber गोपाल रजक याने उत्तर गोव्यातील बागा लेनचा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. धक्कादायक बाब म्हणजे गोव्यातील हि लेन म्हणजे रेड लाईट एरिया असल्याचा उल्लेख त्याने व्हिडिओतून केला होता. रजकचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी प्रितिक्रिया देण्यास सुरुवात केली. भागाची नाहक बदनामी केली जात असल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला.

लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया समोर आल्यानंतर Youtuber गोपाल रजक याने गोमंतकीयांची माफी मागितली आहे. बागा लेनचे चुकीच्या पद्धतीने चित्रिकरण करुन त्याचा अपप्रचार केल्याबद्दल त्याने सॉरी म्हटले आहे. तसेच, रजकने वादग्रस्त व्हिडिओ Youtuber वरुन देखील हटवला आहे.

दरम्यान, गोव्यात कोणत्याही भागात रेड लाईट एरिया अस्तित्वात नाही. याबाबत सरकारी पातळीवर तसेच, पोलिसांकडून वारंवार लक्ष ठेवले जाते. शिवाय कोणतीही आक्षेपार्ह गोष्ट घडणार नाही याची काळजी घेतली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

Goa Mega Project: कारापूर-सर्वण मेगा प्रकल्पावर 2 दिवसांत निर्णय, शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासण्याच्या सूचना

Indian Cricketers Ban: भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा फ्रॉड! अंडर-19 वर्ल्ड कप स्टार अडकला जाळ्यात; 65 खेळाडूंवर बंदी

Goa Accident: गोव्यात अपघातांची धडकी भरवणारी आकडेवारी! 19 महिन्यांत 1107 जणांचा मृत्यू; दिवसाला दोन जीवांचा बळी

Shukra Gochar 2026: वैभव अन् संपत्तीचा कारक बदलणार चाल! शुक्राचे नक्षत्र गोचर 5 राशींसाठी ठरणार वरदान; धनाचा होणार वर्षाव

SCROLL FOR NEXT