Sinquerim 4 year Child Murder Case Dainik Gomantak
गोवा

मोठी बातमी! सिकेरी हत्या प्रकरणातील आरोपी सूचना सेठला 6 दिवसांची पोलीस कोठडी

घटनेतील पुढील तपास सुरू

Kavya Powar

Sinquerim 4 year Child Murder Case

सिकेरी येथील हॉटेलमध्ये झालेल्या 4 वर्षांच्या बाळाच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या सूचना सेठला आज (9 जानेवारी) सुनावणी साठी म्हापसा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी तिला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, काही वेळापूर्वी सूचनाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर तिला कोर्टात हजर केले. सूचना आणि तिच्या पतीमध्ये तणावाचे वातावरण असून त्यांच्या घटस्फोटाची कारवाई सुरू आहे. यामध्ये त्यांच्या 4 वर्षाच्या मुलाच्या ताब्यासाठी कोर्टात लढाई सुरू होती. यातूनच ही हत्या झाली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी प्राथमिक चौकशीनंतर दिली.

सूचना सेठ मानसिक तणावाखाली?

आज म्हापसा न्यायालयासमोर आरोपी सूचनाला हजर केले असता, ती सध्या मानसिक तणावाखाली असल्याचा दावा वकिलांनी केला. त्यामुळे तिला कमी शिक्षा देण्याची विनंती त्यांनी माननीय न्यायालयासमोर केली.

यावेळी आरोपीला सदर घटनेबद्दल काही बोलायचे आहे का, असे कोर्टातर्फे विचारल्यावर, पोलिसांनी थेट आपल्याला इकडे आणले असून, आधी माझ्या वकिलांशी बोलायचे आहे, त्यानंतरच आपण आपली बाजू सांगणार, असे आरोपी सूचनाने सांगितले.

शिवाय, हा गंभीर गुन्हा असून या घटनेतील अनेकांच्या जबान्या नोंदवणे बाकी आहे. तसेच या हत्येमागील आरोपीचा खरा उद्देश कळणे महत्वाचे असल्यामुळे आरोपीला पोलीस कोठडीत ठेवणे गरजेचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. यानंतर सूचनाला तूर्तास 6 दिवसांसाठी पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

असे उघडकीस आले हत्याकांड!

सूचना शेठ यांनी शनिवारी (06 जून) सिकेरी येथील एका हॉटेलमध्ये आपल्या चार वर्षीय मुलासह चेकइन केले. सोमवारी महिला हॉटेलमधून बॅगेसह एकटीच चेकआऊट केले, आणि हॉटेलच्या रिसेप्शनला टॅक्सी बुक करण्यास सांगितले.

टॅक्सी भाडे महाग पडेल त्यामुळे विमान प्रवास करण्याची महिलेला विनंती केली असता तिने टॅक्सीच बुक करण्याचा आग्रह रिसेप्शनकडे धरला. महिला टॅक्सीने बेंगळुरूच्या दिशेने रवाना झाली.

दरम्यान, महिला राहिलेल्या रुममध्ये रक्ताचे डाग सापडल्याने रुमबॉयने तात्काळ हॉटेलमधील वरिष्ठांना कल्पना दिली. पोलिसांना याबाबत माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव प्राथमिक चौकशी करुन टॅक्सी चालकाला संपर्क केला. त्यानंतर कर्नाटकमधील चित्रदुर्ग येथे तिला ताब्यात घेण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramsetu: भुईपालचे विद्यार्थी करणार ‘रामसेतू’वर संशोधन! 43 शिक्षक, विद्यार्थी ‘धनुषकोडी’कडे रवाना; प्रशिक्षण यात्रांतर्गत उपक्रम

Goa Weather: 'काळजी घ्या'! पारा पोचला 34.8 अंशांवर; उकाड्याने नागरिक हैराण

Quepem: '..अंधाराची खंत तू कशाला करिसी रे'! अंथरुणाला खिळलेल्या 75 वर्षाच्या व्यक्तीचे घर कोसळले, श्रमधाममधून 15 दिवसात पुनर्बांधणी

Tiger Reserve Goa: व्याघ्र प्राधिकरणाच्या शिफारशींकडे कानाडोळा! जैविक संपदेच्या अस्तित्वाला धोका; ‘सर्वोच्च’ निकालाकडे लक्ष

Narendra Modi Goa Visit: मोदींची दिवाळी यावर्षी 'गोव्यात'! नौदल जवानांसोबत उत्‍सव करणार साजरा; ‘ऑपरेशन सिंदूर’च्या आठवणींना उजाळा

SCROLL FOR NEXT