Crime Story: टेक कंपनीची CEO, AI तंत्रज्ञानातील एका हुशार महिलेने गोव्यात पोटच्या मुलाचा खून का केला?

टॅक्सी भाडे महाग पडेल त्यामुळे विमान प्रवास करण्याची महिलेला विनंती केली असता तिने टॅक्सीच बुक करण्याचा आग्रह रिसेप्शनकडे धरला.
 Suchana Seth
Suchana SethDainik Gomantak
Published on
Updated on

CEO of startup Kills son in Goa hotel: गोव्यात सोमवारी उघडकीस आलेल्या एका खून प्रकरणामुळे खळबळ उडाली. बेंगळुरू येथील एका टेक कंपनीच्या सीईओ महिलेने पोटच्या चार वर्षीय मुलाचा सिकेरी, कांदोळी येथील एका हॉटेलमध्ये निर्दयपणे खून केला.

मुलाचा मृतदेह बॅगेत भरुन महिला टॅक्सीने बेंगळुरूच्या दिशेने जात असताना दिला चित्रदुर्ग येथे पोलिसांनी अटक केली. महिलेला पुढील चौकशीसाठी गोव्यात आणले जात आहे.

सुचना शेठ (वय 39) असे या महिलेचे नाव असून, महिला उच्च शिक्षित आणि एका एआय कंपनीची मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहे.

घटनेचे ते दोन दिवस

सुचना शेठ यांनी शनिवारी (06 जून) सिकेरी येथील एका हॉटेलमध्ये आपल्या चार वर्षीय मुलासह चेकइन केले. सोमवारी महिला हॉटेलमधून बॅगेसह एकटीच चेकआऊट केले, आणि हॉटेलच्या रिसेप्शनला टॅक्सी बुक करण्यास सांगितले.

टॅक्सी भाडे महाग पडेल त्यामुळे विमान प्रवास करण्याची महिलेला विनंती केली असता तिने टॅक्सीच बुक करण्याचा आग्रह रिसेप्शनकडे धरला. महिला टॅक्सीने बेंगळुरूच्या दिशेने रवाना झाली.

दरम्यान, महिला राहिलेल्या रुममध्ये रक्ताचे डाग सापडल्याने रुमबॉयने तात्काळ हॉटेलमधील वरिष्ठांना कल्पना दिली. पोलिसांना याबाबत माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव प्राथमिक चौकशी करुन टॅक्सी चालकाला संपर्क केला.

 Suchana Seth
माता न तूं वैरिणी! गोव्यात हॉटेलमध्ये केला 4 वर्षीय बाळाचा खून, मृतदेह बॅगेत भरुन आई पसार

मुलगा फातोर्डात मित्राकडे आहे

पोलिसांनी टॅक्सी चालकाच्या फोनद्वारे महिलेशी संपर्क साधला, महिलेला मुलाबद्दल विचारले असता मुलगा फातोर्डा येथे मित्राकडे असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. महिलेची उत्तरं संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी चालकाला टॅक्सी जवळच्या पोलीस स्थानकात घेऊन जाण्यास सांगितले.

टॅक्सी कर्नाटकमधील चित्रदुर्ग पोलीस स्थानकात गेल्यानंतर पोलिसांना महिलेच्या बॅगेत मुलाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी तात्काळ महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केली.

का केला मुलाचा खून?

पोलिसांनी महिलेची चौकशी केली असता संशयित महिला पतीपासून वेगळी झाली होती. पतीसोबतच्या तणावपूर्ण संबधामुळे ती नाराज होती तसेच, त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया देखील सुरु असून, मुलाच्या कस्टडीसाठी लढाईसाठी सुरु होती. अशी माहिती उत्तर गोवा पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिली.

याच वादातून मुलाचा खून केला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, केरळ येथील रहिवासी असणारा महिलेचा पती सध्या कामानिमित्त इंडोनेशियात आहे. पतीला घडलेल्या प्रकाराची माहिती देण्यात आली असून, त्याला भारतात येण्यास सांगितले आहे.

खूनाचा आरोप असलेल्या महिलेचा परिचय

मूळची पश्चिम बंगाल येथील असणारी सुचना सेठ एक उच्च शिक्षित महिला आहे.

सुचना सेठ यांच्या लिंकडइन प्रोफाईलनुसार, 'द माइंडफुल एआय लॅब' या एआय तंत्रज्ञात काम करणाऱ्या कंपनीच्या संस्थापक आहेत. चार वर्षांपासून संस्थेचे नेतृत्व करत आहेत.

सुचना सेठने बर्कमन क्लेन सेंटरमध्ये दोन वर्षे संलग्न म्हणून काम केले, बोस्टन, मॅसॅच्युसेट्समध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगच्या कामात देखील त्यांनी योगदान दिले आहे.

द माइंडफुल एआय लॅबची स्थापना करण्यापूर्वी, सुश्री सेठ बंगलोरमधील बूमरॅंग कॉमर्समध्ये वरिष्ठ डेटा सायंटीस्ट होत्या.

कलकत्ता विद्यापीठातून सेठने प्लाझ्मा फिजिक्ससह खगोल भौतिकशास्त्रात विशेषत: भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.

एवढेच नव्हे तर तिने रामकृष्ण मिशन इन्स्टिट्यूट ऑफ कल्चरमधून प्रथम क्रमांकासह संस्कृतमध्ये पदव्युत्तर डिप्लोमा आणि भवानीपूर एज्युकेशन सोसायटी कॉलेज, कोलकाता येथून प्रथम श्रेणी सन्मानांसह भौतिकशास्त्र (ऑनर्स) पदवी प्राप्त केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com