Cake shop in Goa decorated for Christmas

 

Dainik Gomantak

गोवा

ख्रिसमससाठी गोव्यातील केक शॉप सजली

आज मुख्य मिडनाईट मास : विविध प्रकारच्या केकसह बिबिंका, दोदोल, पुडिंगलाही मोठी मागणी

Anil Patil

पणजी: आनंद आणि उत्सवाचे पर्व म्हणजे  ख्रिसमस. ख्रिस्ती धर्मियांचा  नाताळ हा  सण काही तासांवर आला असून यासाठी गोव्यातले  बहुतांश चर्च सजले आहेत. ख्रिसमसचे मुख्य आकर्षण असते ते केक. यासाठी इथले  केक शॉप  सजली असून या आनंदाच्या क्षणासाठी केक आणि गोड धोड पदार्थांच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे.

गोव्यात (Goa) ख्रिसमस (Christmas Festival) सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शुक्रवारी रात्री नाताळची मुख्य मिडनाईट मास होईल. ख्रिसमसचे मुख्य आकर्षण असणाऱ्या जिंगल बेलचे सूर आळवायला सुरवात झाली असून ही गीते नाताळ संपेपर्यंत वाजत राहाणार आहेत. नाताळचे मुख्य आकर्षण असते ते म्हणजे प्लम केक. हे केक आता तयार केले जात असले तरी त्यांची तयारी अगोदरच सुरू झालेली असते. काही महिने अगोदर केकसाठी लागणाऱ्या पदार्थांचे मिक्सिंग केले जाते. केक मिक्सिंग म्हणजे काजू, बदाम, अक्रोड, बेदाणे, पिस्ता, अंजीर, खजूर यासारखा सुका मेवा एकत्र करून तो वाईन, ब्रँडीमध्ये बुडवून ठेवला जातो. मग त्याचा उपयोग प्लम केकमध्ये केला जातो. या केकला ख्रिसमस मेनूमध्ये महत्त्वाचे स्थान असते.

कुकीज, चॉकलेटलाही मागणी

वेगवेगळ्या स्वादांमधील केक सध्या उपलब्ध आहेत. याशिवाय कुकीज, चॉकलेटही ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. गोव्यातील ख्रिसमससाठी खास गोवन पदार्थांनाही विशेष मागणी असते. यात बिबिंका, दोदोल, पुडिंग यांचा समावेश असतो. ख्रिसमसमध्ये पाहुणे, नातेवाईक, मित्रमंडळींना देण्यासाठी खास गोड पदार्थांचे गिफ्टही बाजारात उपलब्ध आहेत. त्यांनाही मोठी मागणी आहे. सध्या प्लम केकसाठी मोठी मागणी आहे.

आमच्याकडे वेगवेगळ्या आकारामध्ये केक उपलब्ध आहेत. याशिवाय इतरही अनेक प्रकारचे केक आहेत. शिवाय बिबिंका, दोदोल, पुडिंग, रोस , कुकीज यांचे गिफ्ट पॅक आहेत. तेही लोकांकडून खरेदी केले जात आहेत.

- विकास पालांडे, बेकरीमालक, करंजाळे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT