Cacra Water Shortage  Dainik Gomantak
गोवा

Cacra Water Shortage: ऐन पावसाळ्यात काकऱ्यात पाणीटंचाई, गणेशोत्सवात रहिवाशांना त्रास

Cacra Panjim Water Shortage: चतुर्थीच्या काळात ताळीगावमधील काकरा या गावात पाणी टंचाई

गोमन्तक डिजिटल टीम

Cacra, Panjim

पणजी: ऐन चतुर्थीच्या काळात ताळीगावमधील काकरा या गावात पाणी टंचाईमुळे स्थानिक त्रस्त आहेत. गेल्या पाच दिवसांपासून पाण्याची कमतरता निर्माण झाल्यामुळे दैनंदिन कामं देखील पूर्ण होत नाहीत आणि म्हणूनच रहिवाशांना त्रास सहन करावा लागतोय.

स्थानिकांनी एका इंग्रजी वृत्तमाध्यमाला दिलेल्या माहितीनुसार या भागात गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याची गैरसोय होत असून चतुर्थीच्या काळात परिस्थिती आणखीन बिकट झाली आहे.

पावसाळयात जर का पाण्याची एवढी कमतरता असेल तर उन्हाळ्यात हीच परिस्थिती किती गंभीर होऊ शकते अशी चिंता स्थानिक व्यक्त करतायत.

सदर प्रश्नावर अनेक दिवसांपासून अधिकारी वेगवेगळी करणं देत सारवासारव करीत आहेत मात्र मुख्यमंत्र्यांनी या समस्येकडे लक्ष देत स्थानिकांचा प्रश्न सोडवावा अशी मागणी स्थानिकांनी प्रकट केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: मोखर्ड येथे एकाच घरात दोन बहिणींचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह; दुर्गंधी आल्यानंतर उघडकीस आला धक्कादायक प्रकार

RBI New FD Rules: 1 ऑक्टोबरपासून बदलणार एफडीचे नियम! सर्व बँकांसाठी आरबीआयचा 'मास्टरस्ट्रोक'; तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम?

Pond Fish Death Goa: गणपती विसर्जनानंतर कपिलेश्वरी-कवळेच्या तळीत मासे मृत; 'बॉम्बसदृश' फटाक्यांमुळे प्रदूषण झाल्याचा स्थानिकांचा दावा

Gomantak TV Engineers Excellence Awards: जिथे प्रश्न, तिथे अभियंत्यांचा 'तोडगा'! गोमन्तक टीव्ही इंजिनिअर्स एक्सलन्स ॲवॉर्डने 11 अभियंत्यांचा गौरव; खांडेपारकरांना जीवनगौरव

Horoscope 21 Saptember 2026: सोमवारचा चमत्कारिक योग! महादेवाची कृपा अन् ग्रहांची साथ; 'या' राशींवर होणार धनवर्षाव

SCROLL FOR NEXT