Bridge To Mormugao Port Dainik Gomantak
गोवा

Mormugao Bridge: मुरगाव बंदराला जोडणारा पूल उद्‍घाटनाच्या प्रतीक्षेत; अवजड वाहतुकीची समस्या सुटणार

Bridge To Mormugao Port: मुरगाव बंदराला जोडणारा केबल स्टेड पूल तसेच महाराजा हॉटेलजवळील उड्डाणपूल उद्‍घाटनासाठी सज्ज झाले आहेत. ती प्रतीक्षा कधी संपते याकडे वास्कोवासीयांचे लक्ष लागले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Bridge To Mormugao Port

वास्को: मुरगाव बंदराला जोडणारा केबल स्टेड पूल तसेच महाराजा हॉटेलजवळील उड्डाणपूल उद्‍घाटनासाठी सज्ज झाले आहेत. ती प्रतीक्षा कधी संपते याकडे वास्कोवासीयांचे लक्ष लागले आहे. केबल स्टेड पुलावरून कोळसा वाहतूक तसेच मुरगाव बंदरातील अवजड वाहनांची ये-जा सुरू होणार आहे.

वेर्णा ते बायणा-सडा मार्गे मुरगाव बंदर असा महामार्ग बांधण्यात येणार होता. यामुळे सडा भागातील रस्त्याकडची काही घरांवर संकट येणार होते. अभ्यासाअंती बायणातील रवींद्र भवनकडून एका फाटा थेट मुरगाव बंदराला जोडणारा रेल्वेमार्ग व उड्डाण पूल बांधण्याचा प्रस्ताव पुढे आला. त्यानुसार हे काम हाती घेण्यात आले.

हे बांधकाम करताना काही अडथळे दूर करावे लागले. रेल्वेमार्गावर खांब उभारण्याऐवजी तेथे केबल स्टेड पूल बांधण्याचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे कामाला काहीसा विलंब लागला. तसेच केबल स्टेड पुलाला जोडणारा महाराजा हॉटेलजवळचा उड्डाणपूल बांधण्याचा निर्णयही उशिरा घेण्यात आला होता.

सडा भागातील कोळसा प्रदूषण होणार कमी

मुरगाव बंदरातील सर्व वाहनांची ये-जा या केबल पुलावरून होणार आहे. तर महाराजा हॉटेललगतच्या उड्डाणपुलाचा उपयोग वाहनचालकांना वास्कोबाहेर जाण्यासाठी करता येणार आहे. ट्रकांतून होणारी कोळसा वाहतूक मुरगाव बंदर, सडा मार्गे न होता केबल पुलावरून होणार आहे. त्यामुळे सडा भागातील कोळसा प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Maina Curtorim Mega Project Protest: सरपंच, सचिवावर कारवाई करा! मायणा-कुडतरी मेगा गृहप्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Goa Mega Project Protest: गावाचे गावपण नष्ट करु नका! दवंडे प्रकल्पाविरोधात स्थानिकांचा मडगाव पालिकेवर मोर्चा; 15 दिवसांत प्रकल्प रद्द करण्याचे निवेदन

CM Janjatiya Maje Ghar Yojana: आदिवासी बांधवांसाठी खूशखबर! ‘मुख्यमंत्री जनजातीय माझे घर’ योजना सुरु; आता तुमचे घर होणार हक्काचे आणि कायदेशीर

Goa Crime: पुराव्यांअभावी तिघे मुक्‍त; मुख्य आरोपी मात्र फरार, मोरजीतील खोत खून प्रकरणाला कलाटणी

Goa Fishing Industry: "मत्स्यव्यवसाय बाहेरील लोकांच्या हातात जाऊ देऊ नका!" CM सावंतांचं गोमंतकीयांना परखड आवाहन

SCROLL FOR NEXT