C. T. Ravi  Dainik Gomantak
गोवा

Goa Politics : राज्य मंत्रिमंडळ फेररचनेबाबत मुख्यमंत्रीच घेतील निर्णय!

सी. टी. रवी : लोकसभा निवडणुकीत भाजप 350 जागा जिंकणार

दैनिक गोमन्तक डिजिटल

काँग्रेस आमदार भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर मंत्रिमंडळात फेरबदल होईल, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर हे बदल होतील, अशीही चर्चा होती. मात्र ती सत्यात उतरताना दिसत नाही.

याबाबत भाजपचे वरिष्ठ नेते आणि गोवा प्रभारी सी. टी. रवी म्हणाले, मंत्रिमंडळात कुणाला घ्यायचे आणि नाही, हे सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांना असतात. तेच याबाबत निर्णय घेतील. पक्ष केवळ पक्षाचे मत कळवू शकतो आणि तशी विचारणा झाल्यास मुख्यमंत्र्यांना पक्षाचे मत कळवू, असेही ते म्हणाले.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये आमचे चुकलेच, अशी जाहीर कबुली भाजपचे वरिष्ठ नेते आणि गोवा प्रभारी सी. टी. रवी यांनी आज पणजीत पत्रकार परिषदेत दिली.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाला पराभव पत्करावा लागल्यानंतर पहिल्यांदाच ते गोवा दौऱ्यावर आले आहे. यावेळी ते बोलत होते या पत्रकार परिषदेला गोव्याचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, सरचिटणीस दामू नाईक उपस्थित होते.

आज १३ जूनपासून गोव्यात जनसंपर्क मोहीम हाती घेतली आहे.भाजपा आणि कॉंग्रेस यांच्यात तुलना करायची झाल्यास कॉंग्रेस म्हणजे स्कॅम आणि भाजपा म्हणजे स्कीम असे करता येईल, अशी खिल्ली त्यांनी उडवली. भाजपा हा अंत्योदय तत्त्वावर काम करणारा आणि राष्ट्र प्रथम या भावनेने काम करणारा पक्ष आहे. यामुळेच भाजपाने समाजातील सर्व घटकांसाठी विविध योजना सुरू केल्या आणि त्याची यशस्वीपणे अंमलबजावणी केली.

देश विश्‍वगुरू होणार

आज आपल्या देशात लोकशाही आणि परिवारवाद यांच्यात संघर्ष सुरू आहे. भाजपमध्ये लोकशाहीला सर्वोच्च स्थान आहे तर विरोधी पक्षांत केवळ परिवारातील लोक आहेत पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचा प्रामाणिकपणा आणि विरोधकांचा भ्रष्टाचार आज आमनेसामने आले आहेत.

तुष्टीकरण आणि ‘सबका साथ सबका विकास’ यांच्यात लढाई सुरू आहे. विरोधक स्वार्थासाठी एकत्र येण्याची भाषा करत आहेत. कोणीही कितीही प्रयत्न केले, तर २०२४ च्या निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल, असा विश्वास व्यक्त करून सी. टी. रवी यांनी देशाला विश्वगुरु करण्याचे भाजपाचे स्वप्न असल्याचे सांगितले.

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देशाचा कायापालट

रवी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकारने गेल्या ९ वर्षांत देशाचा कायापालट केला आहे. जनतेला याची माहिती आहे. यामुळे २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला ३५० पेक्षा अधिक जागा मिळतील.

२०१४ पूर्वी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारला धोरणात्मक कार्याचा अभाव होता. यामुळे देश पिछाडीवर गेला. पण २०१४ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे देशाने प्रत्येक क्षेत्राचा विकास झाला आहे. भाजपाने गेल्या नऊ वर्षांत केलेल्या सर्वांगीण विकासाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पक्षाने देशभर महासंपर्क उपक्रमाचे आयोजन केले आहे.

कर्नाटकात आमचे चुकलेच!

कर्नाटकातील निवडणुकीतील पराजयामागे अनेक कारण आहेत. यामागे पक्षाच्याही काही चुका आहेत, त्या प्रांजळपणे मी कबूल करत आहे. पक्षाचा झालेला पराभवही आम्ही स्वीकारत आहोत. संघटनात्मक पातळीवर पक्षांतर्गत काही मतभेद होते आणि त्याचा फटका निवडणुकीत झाला.

काही नेते पक्ष विरोधी वागल्याचेही निदर्शनास आले. या निवडणुकीत आरक्षणाच्या मुद्द्यावर लमाणी आणि इतर समाजाने आम्हांला मतदान दिले नाही. त्याचा मोठा फटका पक्षाला बसला, असे सी. टी. रवी यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News Today: मुख्यमंत्री सावंत यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; विधानसभा विजयाबद्दल केले अभिनंदन

Cooch Behar Trophy 2024: दोन पराभवानंतरही गोव्याचा 'यश'वर विश्वास; छत्तीसगडविरुद्धच्या लढतीसाठी टीम सज्ज

IFFI Goa 2024: "हा माहितीपट केवळ श्रद्धांजली नाही, मोहन रानडेंचे स्मारक व्हावे म्हणून केलेला प्रयत्न आहे"; चित्रपट महोत्सवात उभा राहिला मुक्तिसंग्राम

77th Army Day संचलनाची IFFI मध्ये झलक! पुणे सांभाळणार यजमानपदाची धुरा

Goa Crime: महिलांसाठी गोवा नॉट सेफ? 11 महिन्‍यांत सात महिलांची हत्या; लैंगिक अत्याचार, विनयभंगाच्या 100 घटना

SCROLL FOR NEXT