Murgao  Dainik Gomantak
गोवा

'नितळ गोय'चे स्टिकर्स लावून स्वच्छता होत नाही, मुरगाव हार्बर समुद्र किनारी 'स्वच्छता अभियान'चे तीन तेरा

टेकडीखाली प्लास्टिक, मद्याच्या बाटल्या बरोबर खाण्यापिण्याचे साहित्य टाकण्यात आले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मुरगाव हार्बर येथील समुद्र किनारी प्लास्टिक कचर्‍यामुळे अस्वच्छता पसरली आहे. मुरगाव पत्तन प्राधिकरणच्या (एमपीए) पर्यटक जहाज धक्क्यासमोरच असलेल्या टेकडीवर पर्यटक व वाहन चालकांकडून 'स्वच्छ भारत अभियानाचा' फडशा पाडला जात आहे.

संपूर्ण टेकडीखाली प्लास्टिक, मद्याच्या बाटल्या बरोबर खाण्यापिण्याचे साहित्य टाकण्यात आले आहे. यामुळे संपूर्ण हार्बर समुद्र किनार्‍यावर अस्वच्छता पसरलेली आहे.

मुरगाव पत्तन प्राधिकरण व मुरगाव नगरपालिकेने हार्बर समुद्र किनाऱ्यावरील कचरा स्वच्छ करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

मुरगाव हार्बर एमपीएच्या क्रुझ धक्यावर राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय पर्यटक जहाजे येण्याचा मौसम सुरु असून येथे मोठ्या प्रमाणावर देशी - विदेशी पर्यटक येत आहे. तसेच त्यांना गोवा दर्शनासाठी गोवा पर्यटन विकास महामंडळ व स्थानिक पर्यटक टॅक्सी सेवा देत आहे.

परंतु हार्बर समुद्र किनारी जहाजे पाहण्यासाठी येणारे काही पर्यटक सर्रासपणे प्लास्टिक साहित्य समुद्र किनारी असलेल्या टेकडी खाली टाकून जात आहे. यामुळे संपूर्ण समुद्र किनारा परिसर प्लास्टिक कचरा साठून गलिच्छ बनला आहे.

'स्वच्छ भारत अभियाना'अंतर्गत एमपीए मुरगाव सडा - जेटी - बोगदा - बायणा व वास्को परिसरात स्वच्छता अभियान राबवित आहे. मात्र हार्बर समुद्र किनारी टेकडीवर साठलेला प्लास्टिक कचरा एमपीए अधिकार्‍याच्या नजरेस पडत नाही.

मुरगाव नगरपालिका प्रभाग 1 ते 13 पर्यन्त एमपीएतर्फे काही प्रमाणात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. त्याच प्रमाणे एमपीएने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मुरगाव हार्बर परिसरातील कचरा गोळा करण्याचे अभियान सुरू केले पाहीजे.

एमपीएने 'स्वच्छ भारत - नितळ गोय' आपल्या कचरा गोळा करणाऱ्या वाहनांवर लावले म्हणून, परिसर स्वच्छ होत नाही. यासाठी संबंधीत विभागाने संपूर्ण परिसराची स्वच्छता अभियान अंतर्गत काळजी घेणे तेवढेच महत्त्वाचे असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dance Viral Video: जिममध्ये साडीचा स्वॅग! काळ्या साडीत ट्रेडमिलवर तरुणीने धरला ठेका; नेटकरी म्हणाले, 'विषय हार्ड!'

illegal LED fishing: वास्कोत बेकायदेशीर 'एलईडी' मासेमारीचा पर्दाफाश; मत्स्यव्यवसाय विभागाकडून तीन बोटी जप्त

Dhuler: सफर गोव्याची! म्हापसा आणि कुचेली या गावच्या सीमेवरचे, मातीचे ओढ लावणारे 'धुळेर'

VIDEO: "हे संकट लवकर संपलं पाहिजे", पश्चिम आशियातील संघर्षामुळे भारतासमोर मोठं आव्हान, PM मोदींकडून जगाला शांततेचा संदेश

मोफत एन्ट्री अन् स्टेडियमचा फील! 'BCCI'चं क्रिकेटप्रेमींना मोठं गिफ्ट; IPL 2026 चे सामने 'या' 15 शहरांमध्ये पाहता येणार फ्री

SCROLL FOR NEXT