Mopa International Airport | Goa Marathi News | Goa News Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport : ‘मोपा’मुळे दक्षिण गोव्यातील व्यावसायिक चिंतेत

दाबोळी विमानतळ बंद झाल्यास किमान 40 हजार लोकांना फटका बसण्याची शक्यता

गोमन्तक डिजिटल टीम

Mopa Airport : डिसेंबरअखेर उत्तर गोवा पेडणेमधील मोपा विमानतळ सुरू होणार अशी शक्यता आहे. मात्र, यामुळे दक्षिण गोव्यातील व्यावसायिक चिंतेत सापडले आहेत. ‘मोपा’ सुरू होऊन दाबोळी विमानतळ नागरी उड्डाणासाठी बंद झाल्यास दक्षिण गोव्यात पर्यटन व्यवसायात सक्रीय असलेल्या किमान 40 हजार लोकांवर त्याचा थेट परिणाम होणार आहे.

सध्या दाबोळी विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांवर वास्को परिसरातील टॅक्सीवाले व हॉटेल्स उद्योजक असे जवळपास अडीच हजार व्यावासायिक थेट अवलंबून आहेत. संपूर्ण दक्षिण गोव्यातील व्यावसायिक आणि अन्य कर्मचारी लक्षात घेतल्यास हा आकडा 40 हजारांच्या घरात जाऊ शकतो. मोपा विमानतळ सुरू होऊन लगेच दाबोळी विमानतळ बंद केला जाणार नाही ही गोष्ट जरी खरी असली तरी नंतर दाबोळी चालू राहणार नाही असेच एकंदर परिस्थिती पाहिल्यास वाटते आणि तसे झाल्यास वास्कोच्या व्यावसायिकांवर त्याचा विपरीत परिणाम होणार हे निश्चित, असे मत प्रख्यात ट्रॅव्हल एजंट संजय शेट्ये यांनी व्यक्त केले.

सध्या गोव्यात येणाऱ्या विमानांसाठी ‘GOI’ असे तिकिटावर लिहिले जात असले तरी नोव्हेंबरनंतर नोंदणी होणाऱ्या तिकिटांवर ‘GOI’ आणि ‘GOX’ असा पर्याय खुला असेल. ‘GOI’ असे तिकीट देणारे विमान दाबोळीवर उतरणार असून ‘GOX’ तिकीट देणारे विमान मोपावर उतरणार आहे. या संदर्भात दाबोळी विमानतळ प्राधिकरणाचे संचालक धनंजय राव म्हणाले, की अजून अशी दोन वेगवेगळी तिकिटे गोव्यासाठी सुरू केलेली नाहीत असे सांगितले. तर वास्को येथील प्रख्यात ट्रॅव्हल एजंट संजय शेट्ये यांनी नोव्हेंबरनंतरच्या बुकिंगसाठी असे दोन पर्याय उपलब्ध असल्याचे सांगितले.

सरकारने आश्‍वासन पाळावे

‘मोपा’ सुरू होऊन ‘दाबोळी’ बंद होणार, ही भीती वास्कोतील टॅक्सी चालकांना आहे. वास्को विमानतळ काळ्या-पिवळ्या टॅक्सीचालक संघटनेचे सरचिटणीस प्रसाद प्रभूगावकर म्हणाले, ‘दाबोळीवर किमान 250 टॅक्सी सुरू असून ही चिंता आता आम्हालाही सतावू लागली आहे. मात्र, येथील विमानतळ बंद करणार नाही, हे आश्‍वासन सरकारने पाळावे. अन्यथा आम्ही देशोधडीला लागू.’

उपलब्ध एअरस्पेसमध्ये दोन विमानतळ कठीण

लहान व मध्यम हॉटेल्स मालक संघटनेचे अध्यक्ष सेराफिन कोता म्हणाले, ‘मोपा आणि दाबोळी या दोन्ही विमानतळाच्या अंतरात एवढा कमी एअरस्पेस आहे की त्यामुळे गोव्यात एकाच बरोबर दोन विमानतळ चालू राहणे शक्यच नाही. त्यामुळे दाबोळी भविष्यात बंद होणार ही काळ्या दगडावरील रेघ आहे.’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT