Goa  Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील पर्यटन क्षेत्राला उभारी देण्याची उद्योजकांची मागणी

कसिनो, रिव्हर क्रूझ, बार, रेस्टॉरंट्स इत्यादींवरील 50% क्षमतेचे निर्बंध हटवण्याची मागणी पर्यटन क्षेत्राशी निगडीत लोक करत आहेत.

दैनिक गोमन्तक

पणजी: कोविड-19 ची तिसरी लाट जवळपास ओसरली आहे. मागील 2 वर्षात कोरोनामुळे गोव्यातील पर्यटन उद्योगक्षेत्राला मोठा आर्थिक फटका बसला आहे. परिणामी 29 डिसेंबर 2021 पासून राज्यात लागू असलेल्या कसिनो, रिव्हर क्रूझ, बार, रेस्टॉरंट्स इत्यादींवरील 50% क्षमतेचे निर्बंध हटवण्याची मागणी पर्यटन क्षेत्राशी निगडीत लोक करत आहेत.

ट्रॅव्हल अँड टुरिझम इंडस्ट्री असोसिएशन ऑफ गोवाने (TTAG) निवेदनाद्वारे राज्य सरकार आणि पर्यटन मंत्रालय, नवी दिल्ली यांना निर्बंध हटवण्याची मागणी केली आहे. “पर्यटन उद्योगावरील निर्बंध कमी करण्याआधी सकारात्मकता दर कमी होणे आवश्यक असल्याचे सरकारने यापूर्वी सांगितले होते. आता सकारात्मकता दर 2.62% पर्यंत खाली आला आहे आणि कोविड (COVID-19) परिस्थिती जवळजवळ सामान्य आहे. आम्हाला आशा आहे की 28 फेब्रुवारीपासून सर्व रेस्टॉरंट्सना पूर्ण क्षमतेने काम करण्याची परवानगी दिली जाईल," असे TTAG चे अध्यक्ष नीलेश शहा यांनी बुधवारी सांगितले.

आगामी काळात गोव्यात कार्निव्हल आयोजित करण्यात येणार आहे. यामुळे आम्हाला व्यवसायात लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे, असे शहा पुढे म्हणाले.

ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांमुळे गोवा सरकारने 29 डिसेंबर 2021रोजी पर्यटनाशी (Tourism) संबंधित आस्थापनांवर 50% क्षमतेचे निर्बंध लादले होते. मात्र, आता परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचे चित्र दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT