Goa Crime:मार्रा-पिळर्ण येथील व्हिलाचे मालक बिझनेसमन निम्स धिल्लन (77) यांच्या खून प्रकरणी तिघेजण अटकेत आहेत. दरम्यान, यापैकी खून प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचे समोर आलेला आरोपी कृणाल खाटीकच माफीचा साक्षीदार होणार आहे. कृणालने घटना कशी आणि कशामुळे घडली याची माहिती देण्याची कोर्टापुढे मान्य केले आहे.
नरोत्तम सिंग उर्फ निम्स धिल्लन यांचा ०४ फेब्रुवारी २०२४ रोजी खून झाल्याचे उघडकीस आले होते. धिल्लन आपल्या व्हिलातील बेडवर निपचित आढळले होते. याप्रकरणी पोलिसांनी संशयित नितू राहुजा (22 भोपाळ) आणि जितेंद्र साहू (32 भोपाळ) या दोघांना अटक केली. नंतर कृणाल खाटीक (24, मध्य प्रदेश) याला अटक करण्यात आली. दरम्यान, उत्तर गोवा न्यायालयाने कृणालला माफीचा साक्षीदार होण्याची मुभा दिली आहे.
न्यायालयाने कृणालची साक्षीदार म्हणून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. जिंतेंद्र साहूने स्वच्छालयातून बाहेर येत धिल्लन यांचे डोकं टॉवलने झाकलं आणि जोरात मार दिला, अशी कबुली कृणालने दिली आहे. खटिकच्या कबुलीजबाबावर आपण समाधानी असल्याचे फिर्यादीने म्हटलय तसेच त्याची चौकशी केल्याशिवाय इतर दोघांविरुद्ध गुन्हा सिद्ध करणे शक्य होणार नाही असेही म्हटले आहे.
धिल्लन यांचा खून झाल्यानंतर त्यांच्या अंगावरील सुवर्णलंकार व मोबाईल फोन गायब होता. नवी मुंबई गुन्हे शाखाच्या पथकाच्या सहाय्याने गोवा पोलिसांनी वाशी-मुंबई टोलनाक्यावर अडवून जितेंद्र व नीतू यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून चोरीचा 47.82 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. तर, कृणाल खाटीक याला मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली होती.
दरम्यान, याप्रकरणातील इतर दोन संशयित आरोपी नितू राहुजा आणि जितेंद्र साहू यांनी कृणालच्या माफीचा साक्षीदार होण्याला आक्षेप घेतला आहे. कृणालचा खून आणि चोरी करण्यात सक्रीय सहभाग होता. शिक्षा टाळण्यासाठी तो खोटं बोलतोय असे दोन्ही संशयितांनी म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.