Goa Murder Case: मार्रा-पिळर्ण येथील व्हिला मालकाचे खून प्रकरण; मास्टरमाईंडला अटक, खूनाचे कारण समोर

Goa Murder Case: अटक संशयिताने खूनाचा संपूर्ण प्लॅन आखला होता, प्लॅन फसल्यानंतर धिल्लन यांचा खून केल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.
Goa Murder Case
Goa Murder CaseDainik Gomantak

Goa Murder Case

मार्रा-पिळर्ण येथील व्हिलाचे मालक निम्स धिल्लन (77) यांच्या खून प्रकरणातील मास्टरमाईंडला अटक करण्यात आली आहे. खूनाच्या तीन आठवड्यानंतर गोवा पोलिसांना या प्रकरणातील मास्टरमाईंडला अटक करण्यात यश आले आहे.

अटक संशयिताने खूनाचा संपूर्ण प्लॅन आखला होता, प्लॅन फसल्यानंतर धिल्लन यांचा खून केल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

कुणाल खाटीक (24, मध्य प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

कुणालच संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. कुणाल धिल्लन यांच्यासाठी पूर्वी काम करत होता. धिल्लन यांचा ब्लॅकमेल करुन पैसे उकळणे हा त्यांचा उद्देश होता मात्र, त्यांचा प्लॅन फसल्याने सर्वांनी मिळून धिल्लन यांचा खून केला, असे कुणाल याच्या चौकशीतून समोर आले आहे.

पोलिसांनी यापूर्वी नितू राहुजा (22 भोपाळ) आणि जितेंद्र साहू (32 भोपाळ) या दोघांना अटक केली आहे.

Goa Murder Case
Katar Airways: दाबोळीला झटका! कतार एअरवेज जूनपासून मोपावर स्थलांतरीत करणार ऑपरेशन्स

नरोत्तम सिंग उर्फ निम्स धिल्लन यांचा 04 फेब्रुवारी रोजी (रविवारी) सकाळी मृत्यू झाल्याचे उघडकीस आले होते. धिल्लन आपल्या व्हिलातील बेडवर निपचित आढळले होते. त्यांच्या चेहऱ्यावर व शरीरावर काही जखमा होत्या. तसेच त्यांच्या अंगावरील सुवर्णलंकार व मोबाईल फोन गायब होता.

नवी मुंबई गुन्हे शाखाच्या पथकाच्या सहाय्याने गोवा पोलिसांनी वाशी-मुंबई टोलनाक्यावर अडवून जितेंद्र व नीतू यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून चोरीचा 47.82 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. त्यानंतर साथीदार संशयित कुणालचा शोध घेतला जात होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com