Goa Crime News: मार्रा-पिळर्ण येथे व्हिलामालकाचा खून? मुंबईत महिलेसह पुरुष ताब्यात

Goa Crime News: मुंबई येथील टोलनाक्यावर नवी मुंबई क्राईम ब्रँच पोलिसांच्या मदतीने त्यांची कार अडवून ताब्यात घेतले
Goa Crime News |
Goa Crime News | Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Crime News: मार्रा-पिळर्ण येथील हॉरिझन्स आझुरा प्रकल्पातील काही व्हिलांचे मालक असलेले निम्स धिल्लन (७७, रा. कांदोळी, मूळ पंजाब) यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला. याप्रकरणी पर्वरी पोलिसांनी एक पुरुष आणि एका महिलेस वाशी-मुंबई येथील टोलनाक्यावर नवी मुंबई क्राईम ब्रँच पोलिसांच्या मदतीने त्यांची कार अडवून ताब्यात घेतले.

उपलब्ध माहितीनुसार, आज (रविवारी) सकाळी धिल्लन हे निपचित अवस्थेत बेडवर पडलेल्या स्थितीत आढळले. ही घटना त्यांच्या केअरटेकरने पाहताच त्याने मॅनेजर आणि शेजाऱ्यांना याची माहिती दिली.

धिल्लन यांच्या मॅनेजर सीमा सिंग यांनी पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. पर्वरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांना संशयिताच्या शरीरावर काही जखमा तसेच त्यांच्या अंगावरील काही सुवर्णलंकार (सोनसाखळी, हातातील कडा) तसेच मोबाईल फोन गायब असल्याचे लक्षात आले.

Goa Crime News |
Banana Leaves: गोव्यात केळीच्या पानांचा का करतात वापर; जाणून घ्या फायदे...

शनिवारी (ता.३) रात्री या व्हिलामध्ये धिल्लन यांना भेटण्यासाठी त्यांचे काही पाहुणे आले होते. याठिकाणी पार्टी सुरू होती, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी धिल्लन हे मृतावस्थेत बेडवर आढळले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन, पर्वरीचे पोलिस निरीक्षक राहुल परब, उपअधीक्षक विश्वेश कर्पे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलिसांनी ठसेतज्ज्ञ व श्वान पथकाची मदत घेतली. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२, ३९२ नुसार गुन्हा नोंद केला आहे.

Goa Crime News |
Goa Politics: गावडे-तवडकर वादाचे पडसाद आज अधिवेशनामध्ये उमटणार!

घटनाक्रम असा...

  • धिल्लन हे आदरातिथ्य व्यवस्थापन व्यवसायात कार्यरत होते.

  • त्यांचे हॉरिझन्स आझुरा प्रकल्पामध्ये तीन व्हिला होते.

  • त्यातील एका व्हिलामध्ये ते स्वतः राहायचे.

  • इतर दोन व्हिला त्यांनी भाड्याने दिले होते.

  • निम्स धिल्लन बेडरुममध्ये पलंगावर निपचित पडलेले आढळले.

  • त्यांच्या शरीरावर काही जखमा आढळल्या.

  • मुंबईमधून ताब्यात घेतलेल्या महिला व पुरुषाने गोव्यातून रेंट अ कार घेतली होती.

  • या कारला जीपीएस ट्रॅकर लावला होता.

  • धिल्लन यांनीच ही कार मागवून घेतली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com