Online Fraud And Drug Case In Mapusa
Online Fraud And Drug Case In Mapusa Dainik Gomantak
गोवा

Mapusa Online Fraud: म्हापशात व्यावसायिकाला 18.27 लाखांचा गंडा तर, बोडगिणी येथून सहा लाखांचे अमली पदार्थ जप्त

Pramod Yadav

Mapusa Crime News: म्हापासा येथून दोन घटना समोर आल्या आहेत. एका घटनेत व्यावसायिकाला तब्बल 18.27 लाख रूपयांचा गंडा घातला आहे. तर, बोडगिणी येथून सहा लाख रूपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

(Online Fraud And Drug Case In Mapusa)

पहिल्या घटनेत ऑनलाईन व्यवसाय (Online Business) सुरू करण्याचे आमिष देत व्यावसायिकाला गंडा घातला आहे. व्यासायिकाला जादा मिळविण्यासाठी विविध मोबाईल अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर त्याला 18.27 लाख रूपयांचा गंडा घातला आहे.

याप्रकरणी अज्ञाताविरोधात सायबर क्राईम (cyber crime) विभागात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

बोडगिणी येथून सहा लाखांचे अमली पदार्थ जप्त

अमली पदार्थ विभागाने बोडगिणी, म्हापसा येथे केलेल्या कारवाईत सहा लाख रूपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. पोलिसांनी अनिल रघुवीर गडेकर (वय 62, रा. ज्योती अपार्टमेंट, आल्त, म्हापसा) या वृद्धाला अटक केली आहे.

पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी संशयित व्यक्तीला अटक केली असून, त्याच्यावर एनडीपीएस कायद्याअंतर्गत (NDPS Act) गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याकडून सहा ग्रॅम एम्फाटामाईन हा अमली पदार्थ जप्त केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: मांडवीखाडी वेंगुर्ला येथे म्हापशातील विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

CM Pramod Sawant: 'साखळीत येत्या 5 वर्षांत 25 हजार लिटर दूध उत्पादनाचे ध्येय'

Illegal Constructions: किनारपट्टी लगतची बेकायदा बांधकामे तातडीने पाडा; दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Goa Crime News: नेरुळ येथे बनावट कॉल सेंटर चालवणाऱ्यांचा पर्दाफाश; पोलिसांकडून तिघांना अटक

Goa: राज्यात दोन ठिकाणी आगीच्या घटनेत मोठे नुकसान हानी; जीवितहानी टळली

SCROLL FOR NEXT