Bushes grew on power poles Dainik Gomantak
गोवा

हळदोणेत वीजखांबांवर वाढली झाडी

या झुडपांमुळे लोकांना धोका निर्माण झाला असून, ती तातडीने कापण्यात यावीत, अशी मागणी होत आहे.

दैनिक गोमन्तक

म्हापसा : हळदोणा मतदारसंघातील विविध रस्त्यांवरील वीज खांबांवर मोठ्या प्रमाणात वेलीची झाडी वाढली आहेत. या वेलींमुळे पथदिव्यांचा प्रकाश व्यवस्थित पडत नाही. याशिवाय या झुडपांमुळे लोकांना धोका निर्माण झाला असून, ती तातडीने कापण्यात यावीत, अशी मागणी होत आहे.

वीज खात्याकडून दरवर्षी मॉन्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीची कामे वीजपुरवठा खंडित करून हाती घेतली जातात. यावेळी धोकादायक स्थितीत वीजवाहिन्यांवरील वाढलेल्या झाडाझुडपांसह वेली कापल्या जातात. मात्र यावर्षी वीजपुरवठा खंडित करूनही हळदोणा मतदारसंघातील अनेक भागांत ही कामे व्यवस्थित केलेली नाहीत, असेच चित्र दिसते. हळदोणा मतदारसंघातील गाळवार येथील वीज खात्याच्या उपकेंद्रापासून हाकेच्या अंतरावरही असे प्रकार घडल्याची माहिती काही लोकांनी दिली. पोंबुर्फा, ओळावली भागात, खोर्जुवे, किटला-हळदोणा तसेच इतर अनेक भागांत वीज पोलांवर वाढलेली ही झुडपे कापण्यात यावीत, अशी मागणी केली जात आहे.

संबंधितांनी कामे वेळेत पूर्ण करण्याची आवश्‍यकता

हळदोणातील स्थानिक अमरनाथ पणजीकर यांनी खात्याच्या अभियंत्यांनी धोकादायक अवस्थेतील ही झुडपे कापावीत, अशी मागणी केली. पावसाळ्यात या झाडाझुडपांमुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडण्याची शक्यता असते. सरकारने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. पोंबुर्फा येथील मिथुन म्हांबरे यांनी ओळावली परिसरात वाढलेली ही झुडपे कापण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे अशा नियमित कामांकडे संबंधित खात्याने आपणहून लक्ष देत ही कामे वेळेत पूर्ण करण्याची आवश्यकता असते, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Video: FA9LA ची 'ट्रेंडिंग' स्टेप अक्षयने बसवली! डान्स कोरियोग्राफरचा खुलासा; म्हणाला, लडाखची उंची, हातात ऑक्सिजन सिलिंडर घेऊन तो...

हडफडे दुर्घटना; समिती नेमली, पाहणीही झाली! पण कारवाई होणार का? 'लईराई जत्रोत्सवा'च्या दुर्घटनेचा अहवाल आजही धूळ खात - संपादकीय

Goa Nightclub Fire: 'हा अपघात नव्हे, 25 जणांचा खून! हडफडे नाईटक्लब दुर्घटनेवरून आमदार लोबो संतापले; Watch Video

Goa Politics: खरी कुजबुज; युतीचा 'चॅप्टर' कोणी 'क्लोज' केला?

Goa Live News: मडगाव सरकारी केंद्रावर 'हाय व्होल्टेज ड्रामा'; भाजप कार्यकर्त्यांचा पोलिसांशी वाद

SCROLL FOR NEXT