Bus Stand  Dainik Gomantak
गोवा

फोंडा बस स्थानकाबाहेर उभे राहणारे प्रवासी त्रस्त

प्रवाशांना रस्त्यावर उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागत आहे.

दैनिक गोमन्तक

फोंडा: येथील कदंब बस स्थानकाचे दुरुस्तीचे काम काही दिवसातच सुरु होणार आहे. परिणामी प्रवाशांना बस स्थानकात जाण्याची परवानगी नाही. यामुळे प्रवाशांना रस्त्यावर उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. बस स्थानकाची दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.

कदंब बस (Bus) स्थानकात मागील 5-6 दिवसापासून प्रवाशांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. यामुळे त्यांची मोठ्याप्रमाणात गैरसोय होत आहे. या बस स्थानकाची दुरुस्ती करण्यात येणार असल्याने परिसरात पत्रे लावण्यात आले आहेत. या स्थानकावरुन अनेक प्रवाशी अन्य राज्यात ये-जा करत असतात. त्या सर्वांना यामुळे त्रास सहन करावा लागत आहे.

गेल्या काही दिवसापासून गोव्यात (Goa) उकाडा वाढल्याने उन्हात उभे राहणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. कदंब महामंडळाने निदान प्रवाशांना उभे राहण्यासाठी शेड उभे करावे, असे लोकांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

49 तास, 44 मिनिटांत 210 किमी अंतर पोहून पार! आर्यन सिंगची समुद्रातील चित्तथरारक झुंज; अजितदादांना अनोखी श्रद्धांजली

Porvorim Flyover: पर्वरीकरांसाठी आनंदाची बातमी! उड्डाणपूल गणेश चतुर्थीपूर्वीच पूर्ण होणार, डांबरीकरणास प्रारंभ; मंत्री कामतांची मोठी माहिती

मैदानावर काळाचा घाला! 'रुईशा'चा हॉकीचा सराव ठरला अखेरचा, डोक्याला चेंडू लागून 14 वर्षीय खेळाडूचा मृत्यू; क्षणात होत्याचं नव्हतं झालं

Goa Politics: "नव्या चेहऱ्यांना संधी द्या" नितीन नबीन यांचा मुख्यमंत्री आणि दामू नाईकांना मोलाचा सल्ला; आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप सज्ज

"कर्नाटकला 16 बेटे काय, इंचभर जमीनही देणार नाही!" मुख्यमंत्री सावंतांनी ठणकावलं; गोव्याच्या अस्मितेसाठी सरकार आक्रमक

SCROLL FOR NEXT