Poinguinim Marliwada Bus Service Canva
गोवा

Poinguinim: अखेर गोव्यातील 'त्या' दुर्गम गावी बस पोहोचली! सहाशे नागरिकांना होणार फायदा

Poinguinim Bus Service: पैंगीण पंचायत क्षेत्रातील खोतीगाव अभयारण्य कक्षात येणाऱ्या दुर्गम अशा मार्लीवाड्यापासून बससेवा सुरू करण्यात आली आहे.

Sameer Panditrao

Poinguinim Marliwada Bus Service

काणकोण: पैंगीण पंचायत क्षेत्रातील खोतीगाव अभयारण्य कक्षात येणाऱ्या दुर्गम अशा मार्लीवाड्यापासून बससेवा सुरू करण्यात आली आहे.

मार्ली वाड्यापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या तिर्वाळपासून कदंब बसच्या सकाळ व संध्याकाळ अशा दोन फेऱ्या होतात. मात्र, मार्ली येथील सुमारे सहाशे लोकसंख्या असलेल्या रहिवाशांना चालत तिर्वाळ येथे येऊन बस पकडावी लागते होती. त्याचा सर्वाधिक त्रास शाळकरी मुलांना होत होता. मार्ली ते तिर्वाळ हा भाग निर्जन असून काहीवेळा शाळकरी मुलांना चालत येताना वन्य श्वापदांना सामोरे जावे लागत होते.

यापूर्वी रस्ता व अन्य मूलभूत सोयीच्या मागणीसाठी येथील मतदारांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. आता सभापती डॉ. रमेश तवडकर व पैंगीणच्या सरपंच सविता तवडकर यांच्या प्रयत्नामुळे कदंब महामंडळाच्या ‘माझी बस’ या योजनेतून ही बससेवा सुरू करण्यात आली आहे. सकाळी ७ वाजता मार्ली गावातून तिर्वाळ - दाबेल - आमोणे - शिशेव्हाळमार्गे काणकोण या मार्गावरून ही माझी बससेवा सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर संध्याकाळी ५.५५ वाजता पुन्हा काणकोण बसस्थानकावरून ही बस त्याच मार्गे मार्ली वाड्यावर जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA 5th T20: मालिकेचा फैसला अहमदाबादमध्ये! पाचव्या टी-20 सामन्यावर हवामानाचं सावट की पावसाची खेळी? जाणून घ्या खेळपट्टी आणि वेदर रिपोर्ट

हडफडे अग्नितांडव प्रकरण! 'बर्च बाय रोमिओ लेन'च्या मालकांचे धाबे दणाणले; अजय गुप्ताची जामिनासाठी कोर्टात धाव

Goa Raj Bhavan Name Change: गोव्यात ऐतिहासिक निर्णय! 'राजभवन' आता ओळखले जाणार 'लोकभवन' नावाने; राज्यपालांनी पुसली वसाहतवादी ओळख

Cyber Fraud: 'अनन्या'च्या जाळ्यात अडकला एसबीआय क्लर्क, फेसबुकवरची एक फ्रेंड रिक्वेस्ट अन् 92 लाखांचा गंडा; काय नेमकं प्रकरण?

बेतुल ONGC परिसरात अग्नितांडव! वेल्डिंगच्या ठिणगीमुळे भीषण आग; प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

SCROLL FOR NEXT