Mumbai Goa Highway Burning Bus Dainik Gomantak
गोवा

Mumbai Goa Highway: मुंबई - गोवा महामार्गावर धावत्या बसला आग; 34 प्रवासी थोडक्यात बचावले, बस, साहित्य जळून खाक

Mumbai Goa Highway Burning Bus: बसच्या मागे मोठा आवाज झाल्याने चालकाने पाहणी केली असता बसच्या मागच्या चाकाला आग लागल्याचे दिसून आले.

Pramod Yadav

Mumbai Goa Highway Burning Bus

कोलाड: मुंबई - गोवा महामार्गावर धावत्या खासगी बसने अचानक पेट घेतल्याची घटना उशीरा रात्री उघडकीस आली. आगीचा भडका उडाल्याने बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. या बसमध्ये असणारे ३४ प्रवासी मात्र थोडक्यात बचावले आहेत. बसच्या मागे मोठा आवज झाल्याने चालकाने खातरजमा करण्यासाठी पाहणी केली असता बसला आग लागल्याचे उघडकीस आले.

मुंबई - गोवा महामार्गावर कोलाड येथे कोकण रेल्वे पुलाजवळ ही घटना घडली. मुंबईतील जोगेश्वरी येथून मालवणला खासगी बस जात होती. बसमध्ये सुमारे ३४ प्रवासी होती. कोलाड येथे आल्यावर बसच्या मागच्या बाजूस मोठा आवाज झाला. चालकाने आवाज झाला म्हणून बसची पाहणी केली असता मागच्या चाकाला आग लागल्याचे उघडकीस आले. सजग चालकाने तात्काळ सर्वांना सूचित करुन प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले.

बसमधून सर्व प्रवाशांना तात्काळ खाली उतरवण्यात आले. दरम्यान, काही क्षणातच बसने पेट घेतला आणि बघता - बघता आगीचा भडका उडाला. यात बसमधील साहित्यासह बस जळून खाली झाली आहे. दैव बलवत्तर म्हणून बसमधील ३४ प्रवासी थोडक्यात बचावले. दरम्यान, अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होते. आगीवर नियंत्रण मिळवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT