bus fire in Panaji Ponda route  Dainik Gomantak
गोवा

बाणास्तरी पुलावर बसने घेतला पेट, प्रवाशी सुरक्षित

ही आग नेमकी कशी लागली याचा तपास सुरू आहे

दैनिक गोमन्तक

गोव्यात फिरण्यासाठी आलेल्या प्रवाशांच्या बसला अचानक आग लागली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. बसमधील सर्व प्रवाशी सुरक्षित आहेत. अचानक बस ने पेट घेतलेला पाहून आसपासच्या नागरिकांची देखील चांगलीच तारांबळ उडाली होती. बसचा वाढता धूरांचा लोळ पाहून नागरिकांनी अग्निशमन दलाला याची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत ही आग आटोक्यात आणली. ही आग (fire) नेमकी कशी लागली याचा तपास सुरू आहे.

दरम्यान, पणजी-(Panaji) फोंडा मार्गावरील बाणस्तारी पूल येथे या घटनेमुळे काही काळ वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. बसमधील प्रवाशी यावेळी घाबरून गेले होते. प्रवाशांचे दैनंदिन साहित्य, कपडे यात जळून खाक झाले आहे.

दरम्यान, नागपूर (Nagpur) येथील मेडिकल चौकात एका सिटी बसला गुरुवारी भीषण आग लागली. इंजिनला आग लागल्याचे कळताच चालकाने प्रसंगावधान राखत सर्व 45 प्रवासी बसमधून खाली उतरवले. यामुळे मोठा अनर्थ टळला.

त्यानंतर आग पसरून पाहता पाहता सगळी बस जळून खाक झाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दाेन बंब घटनास्थळी आले. काही वेळानंतर त्यांनी ही आग आटोक्यात आणली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT