Burning Car Dainik Gomantak
गोवा

Parra : पर्रा येथे बर्निंग कारचा थरार; पार्क केलेल्या गाडीने घेतला पेट, सुदैवाने जीवितहानी नाही

पिळर्ण अग्निशमन दलाच्या जवानांनी मिळविले आगीवर नियंत्रण

Rajat Sawant

पर्रा येथे एका कारला आग लागल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या घटनेची माहिती मिळताच पिळर्ण अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले व आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र तोपर्यंत कार आगीत जळून खाक झाली होती. ही घटना एका खुल्या हॉलच्या पार्किंग जागेत घडली.

पर्रा येथे एका खुल्या हॉलच्या पार्किंग जागेत एक कार पार्क करण्यात आली होती. यावेळी स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री पार्क केलेल्या कारच्या परिसरात फटाके लावल्याने कारने पेट घेतला व क्षणार्धात कार जळून खाक झाली. घटनेची माहिती पिळर्ण अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानुसार अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविले.

असाच एक बर्निंग कारचा थरार शुक्रवारी मडगावात पहायला मिळाला होता. मडगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका टाटा इंडिका कारने पेट घेतला. आगीत ही गाडी संपूर्ण जळून खाक झाली. सुदैवाने कारचालकाने प्रसंगावधान दाखवून गाडी रस्त्याच्या बाजूला नेऊन पार्क केल्याने त्याने स्वतःचा जीव वाचवण्यासोबतच इतरांनाही आगीच्या धोक्यापासून वाचवलं.

हा प्रकार मडगाव पणजी मुख्य रस्त्यावर घडला. गाडीतून धूर येऊ लागल्याने गाडी चालवत असलेल्या आशुतोष सिंग याने त्वरित आपली गाडी रस्त्याच्या बाजूला घेऊन रहदारीपासून ती दूर नेली. एवढ्यात गाडीने पूर्ण पेट घेतला. चालकाने झटपट बाहेर येत आपला जीव वाचविला. सदर चालक पणजीहून दक्षिण गोव्यात येत असताना ही दुर्घटना घडली. ही आग नेमकी कशामुळे लागली ते कळू शकले नाही. नंतर अग्निशमन दलाने ती आटोक्यात आणली. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT