Bumper Catch of mackerel on Benaulim beach Dainik Gomantak
गोवा

Bumper Catch: बाणावली किनाऱ्यावर बांगड्याची बंपर कॅच! मात्र मच्छीमारांना मिळत नाही योग्य भाव

बाणावली किनाऱ्यावर पारंपारिक मच्छीमारांना काल (मंगळवारी) संध्याकाळी बांगड्याची बंपर कॅच मिळाली.

Kavya Powar

Traditional Fishing in Goa: बाणावली किनाऱ्यावर पारंपारिक मच्छीमारांना काल (मंगळवारी) संध्याकाळी बांगड्याची बंपर कॅच मिळाली. मात्र मासळी विकण्यासाठी मार्केटिंगचे मार्ग नसल्यामुळे आणि घाऊक मासळी बाजार बंद झाल्यामुळे, मच्छीमारांना मासेमारीसाठी चांगला दर न मिळाल्याने त्यांच्यामध्ये नाराजी आहे.

घाऊक मासळी बाजार सुरू असता तर मच्छीमारांनी मासळी बाजारात विक्रीसाठी नेली असती. मडगाव, फातोर्डा आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिक, विशेषत: कार्यालयात जाणारे लोक घरी परतण्यापूर्वी समुद्रात जाळ्यात अडकलेले ताजे मासे विकत घेतात. मात्र मोठ्या प्रमाणात सापडलेले मासे बाजारात जितके विकले जातात तेवढे इतर ठिकाणी विकले जात नाहीत.

उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या नावाखाली एसजीपीडीएने घाऊक मासळी बाजार बंद केल्याने पारंपरिक मच्छीमारांना बाजारात येणे बंद करण्याशिवाय पर्याय उरला नाही. त्यामुळे जाळ्यात सापडलेल्या माशांचा म्हणावा तसा भाव त्यांना मिळत नाही.

कोणताही पर्याय नसल्यामुळे मच्छिमारांना मासे किनार्‍यावरच विकावे लागतात किंवा दुसर्‍या दिवशी बाजारात आणण्यासाठी बर्फात माशांची साठवणूक करावी लागत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ganesh Chaturthi: वय वर्षे 84, तरीही गणरायाची सेवा; वयाच्या 10व्या वर्षांपासून जोपासली आहे मूर्तिकलेची आवड

Goa Live News: मरड-धारबांदोडा येथील बेकायदेशीर चिरे खाणीवर छापा!

Bear Attack Quepem: चिंताजनक! अस्वलाने केला प्राणघातक हल्ला, केपेतील शेतकरी गंभीर जखमी

Goa Politics: सोमवारी होणार खातेवाटप, दामू नाईकांची स्पष्टोक्ती; अमावस्येमुळे निर्णय लांबल्याचा निर्वाळा

Goa Cricket: दिल्ली कॅपिटलचा 'हा' आक्रमक फलंदाज खेळणार गोव्याकडून, अष्टपैलू खेळाडूमुळे वाढली ताकत

SCROLL FOR NEXT