Savoi Verem News: शितोळ जलप्रकल्पाला विरोध ग्रामस्थ आक्रमक ; स्थानिकांना विश्‍वासात घेण्याची मागणी

Savoi Verem News: दोन दिवसांपूर्वी रस्त्याच्या बाजूस फलक लावून या प्रकल्पाचे काम ३० जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण करण्यात येईल.
Savoi Verem
Savoi VeremDainik Gomantak
Published on
Updated on

Savoi Verem News : सावईवेरे, गोव्यात गाजलेल्या भूतखांब पठाराजवळच्या सावईवेरे येथील ‘शितोळ’ तळ्याच्या जलप्रकल्पाच्या कामास प्रारंभ झाला असून या कामामुळे या भागात नैसर्गिक जलस्रोत बंद झाल्याने सडा, कावंगाळ,

करमटे या वाड्यावरील लोकांचे पाण्यासाठी हाल व्हायला लागताच कावंगाळ भागातील बऱ्याच महिला व युवक शितोळ भागात एकत्र येऊन सदर काम बंद पाडले.

या वाड्यावरील लोकांना विश्वासात न घेतल्यामुळे विशेष ग्रामसभा घेऊन या पाणी प्रकल्पासंबंधी सविस्तर माहिती द्यावी, असे आज ग्रामस्थांनी स्पष्ट केले.

गेल्या आठवड्यात कोणताही गाजावाजा न करता या कामास प्रारंभ झाला होता. दोन दिवसांपूर्वी रस्त्याच्या बाजूस फलक लावून या प्रकल्पाचे काम ३० जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण करण्यात येईल.

या कामासाठी ३ कोटी ७५ लाख ७६ हजार ९३९ रुपये खर्च येणार आहेत अशी नोंद करण्यात आली आहे.

वाड्यावरील ग्रामस्थ येथून वाहणाऱ्या नैसर्गिक पाण्यावरच अवलंबून आहेत. परंतु आज सकाळी अचानक जलस्रोत बंद झाल्यामुळे त्यांचे पाण्याविना हाल झाले. त्यामुळे त्यांनी या भागात मोर्चा नेऊन ते काम बंदपाडले.

शितोळ तळे हे अत्यंत जुने असून त्या तळ्याच्या बांधणीसाठी अंदाजे ९ लाख रुपये व त्यानंतर ३२ लाख रुपयांच्या निविदा बऱ्याच वर्षांपूर्वी काढण्यात आल्या होत्या.

पण ते काम नंतर मार्गी लागले नाही. परंतु आता सुमारे पावणे चार कोटी रुपये खर्चाचा आराखडा जलस्रोत खात्यातर्फे ( डब्लू.आर.डी.) मार्फत मंजूर करण्यात आल्याने लोक संभ्रमात पडले आहेत.

या तळ्याच्या एका बाजूची फार मोठी जमीन गोव्यातील बड्या उद्योगपतीने खरेदी केली असून त्याठिकाणी काटेरी तारांचे कुंपणही घालण्यात आले आहे. त्या जागेत मोठा प्रकल्प येणार असल्याची चर्चा ग्रामस्थ करीत आहेत.

बड्या उद्योगपतीच्या भल्यासाठीच शितोळ तळ्याच्या बांधणीचे काम हाती घेण्यात आले असल्याचे मत काही ग्रामस्थांनी व्यक्त केले.

एवढ्या मोठ्या पाणी प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ सोहळाही कोणताही गाजावाजा न करता झाला की नाही, हेही अधांतरीच असल्याने गुपचूपपणे हे काम चालू असल्याने यात काहीतरी गौडबंगाल आहे, ते समजणे कठीण असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्तकेले.

Savoi Verem
Panaji News : वाहतुकीबाबत नियम पाळणे चालकांची प्रथम जबाबदारी : अक्षद कौशल

विशेष ग्रामसभेत निर्णय

यावेळी घटनास्थळी सरपंच शोभा पेरणी व पंच लोचन नाईक उपस्थित होत्या. विशेष ग्रामसभा घेऊन सत्य माहिती जाणून घेऊनच पुढील निर्णय घेण्याचे ठरले.

मुर्डी येथे बंधारा बांधणे, शितोळ तळ्याचे बांधकाम करणे व नंतर प्रकल्पांना पाणी पुरविणे अशा सरकारच्या गुप्त योजना असल्याची टीकाही यावेळी ग्रामस्थांनी केली. हे काम लोकांच्या भल्यासाठी की बड्या उद्योगपतींच्या भल्यासाठी आहे, याबाबत ग्रामस्थांकडून प्रश्‍न विचारण्यात आला.

नागरिकांशी चर्चा

शितोळ भागात नागरिक जमताच कंत्राटदार तिथून नाहीसे झाले. काही वेळाने जलस्रोत खात्याचे साहाय्यक अभियंता शैलेश नाईक व निम्न अभियंता एकनाथ केरकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.

पण वॉर्ड क्र. ६ मधल्या ज्या ग्रामस्थांना या तळ्याच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते, त्यांना अंधारात ठेवून गुपचूपपणे कामास प्रारंभ का करण्यात आला, असे प्रश्न अनेकांनी उपस्थित केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com