Nagraj Manjule Goa Dainik Gomantak
गोवा

Nagraj Manjule In Goa: "सिनेमा म्हणजे केवळ पडद्यावरची हिरोगिरी नाही"! बुलबुल महोत्सवात नागराज मंजुळेंनी मांडले परखड मत

Bulbul Film Festival 2026: मडगाव रवींद्र भवनात आयोजित तिसऱ्या आंतरराष्ट्रीय बुलबुल बालचित्रपट महोत्सवाच्या उद्‌घाटनप्रसंगी मंजुळे बोलत होते.

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: सिनेमा हे जगाशी ओळख करून देणारे एक प्रभावी माध्यम आहे. सिनेमा म्हणजे केवळ पडद्यावरची हिरोगिरी नाही. त्‍यात सामान्य माणसे आणि त्यांच्या सुख-दुःखाची परिणामकारक मांडणी असायला हवी, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केले.

मडगाव रवींद्र भवनात आयोजित तिसऱ्या आंतरराष्ट्रीय बुलबुल बालचित्रपट महोत्सवाच्या उद्‌घाटनप्रसंगी मंजुळे बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, आमदार उल्हास तुयेकर, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, अभिनेते आनंद इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मंजुळे म्हणाले, मुलांच्या भावविश्वाशी नाते सांगणारे चित्रपट बविनणे काळाची गरज आहे. लहान वयातच सिनेमाची योग्य ओळख झाली, तर त्यातून उद्याचे उत्तम चित्रपट निर्माते घडतील. दिगंबर कामत यांनी हा महोत्सव गोव्याचे आकर्षण असल्याचे सांगून तो देशातील पहिल्या क्रमांकाचा बालचित्रपट महोत्सव व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली.

तर, दामू नाईक यांनी सिनेमाकडे रोजगाराचे साधन म्हणून पाहतानाच त्यातून चांगल्या मूल्यांचे संस्कार घेण्याचे आवाहन केले. माहिती व प्रसिद्धी अधिकारी सिद्धेश सामंत यांनी स्वागत केले. संचालक बिपीन खेडेकर यांनी माहिती दिली. शेवटी सिद्धेश नाईक यांनी आभार मानले.

महोत्सवाचे खास आकर्षण

संकल्पना : यावर्षी महोत्सवाची संकल्पना ‘प्राणी’ असून पूर्ण परिसरात विविध प्राणी व पक्ष्‍यांचे कट-आउट्स लावण्यात आले आहेत. सांस्कृतिक मेजवानी : उद्‌घाटन सोहळ्यात ‘बॅण्‍ड साल्सा'' आणि ‘अक्षय डान्स अकॅडमी’ने नृत्याविष्कार सादर केले. स्पर्धांना प्रतिसाद : खुल्या रंगमंचावर झालेल्‍या वेशभूषा आणि समूह नृत्यस्पर्धेला विद्यार्थी-पालकांचा उदंड प्रतिसाद लाभला. उद्‌घाटन सोहळ्यानंतर ‘एप्रिल मे ९९’ या मराठी चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले.

पुढील कार्यक्रम

उद्या बुधवारपासून महोत्सवात तीन पडद्यांवर विविध देशांतील बालकेंद्री चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे. सोबतच मुलांसाठी चित्रपटविषयक कार्यशाळा आणि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

गुणवंतांचा गौरव

महोत्सवाच्या निमित्ताने विविध क्षेत्रांतील बालप्रतिभांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्‍यात नेहा देऊलकर (तायक्वांदो व जलतरण), अमायरा धुमटकर (बॅडमिंटन), पूर्वी नाईक (जलतरण), आराध्या ठाकरे (तायक्वांदो). तसेच दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि ज्युरी सदस्यांनाही सन्‍मानित करण्‍यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Transcend Goa 2026: ट्रान्सेंड गोवा- 26 चा बिगुल! कथानिर्मात्यांसाठी संधीचे द्वार; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Train Accident: काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! चालत्या ट्रेनवर कोसळले क्रेन, 22 जणांचा मृत्यू, 30 हून अधिक जखमी; युद्धपातळीवर बचावकार्य सुरु VIDEO

'RSS'वरून रणकंदन! "स्वातंत्र्यलढ्यात योगदान कुठे? पुराव्यासह चर्चेला या" आप प्रदेशाध्यक्षांचे दामू नाईकांना खुले आव्हान

Kushavati District: नवीन जिल्हा मुख्यालयासाठी केपे सज्ज, कुशावती योग्य नाव; केपेवासीयांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

Pilgao Protest: खाण कंपनीविरुद्ध शेतकऱ्यांची वज्रमूठ! पिळगावात खनिज वाहतूक ठप्पच; प्रशासकीय पातळीवर चर्चा सुरू

SCROLL FOR NEXT