Buffalo  Dainik Gomantak
गोवा

Buffalo Stuck in Canacona: पोस्ट ऑफिसच्या इमारतीत अडकला 'रेडा'; फटाके फोडूनही आला नाही बाहेर, अखेर...

Post Office Goa: बंद असलेल्या फ्लॅटच्या बाहेरचा रेड्याने त्याचा मुक्काम ठोकला होता.

Pramod Yadav

काणकोण: पोस्टाच्या कार्यालयात रेडा अडकून पडल्याची घटना चावडी, काणकोण येथे उघडकीस आली. पहिल्या मजल्यावर अडकून पडलेल्या या रेड्याला बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठी कसरत करावी लागली. रेड्याला बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी विविध शक्कल लढवल्या खऱ्या पण त्याला यश येत नव्हते.

चावडी, काणकोण येथे एका इमारतीत पहिल्या मजल्यावर पोस्टाचे कार्यालय आहे. येथे पोस्ट मास्तरला राहण्यासाठी एक फ्लॅट आहे पण, या कोणी राहत नसल्याने तो बंद आहे. या फ्लॅटच्या बाहेरचा रेड्याने त्याचा मुक्काम ठोकला होता. दरम्यान, येथे आल्यावर तो तिथेच अडकून पडला.

रेड्याला बाहेर जाण्याचा मार्ग सापडत नसल्याने काही दिवस तो तिथेच होता असा अंदाज बांधला जात आहे. रेड्याने या ठिकाणी केलेल्या मलमुत्राची दुर्गंधी सर्वत्र पसरली होती. दरम्यान, त्याला बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी रेड्याला बाहेर काढण्यासाठी पहिल्या मजल्यावर धाव घेतली पण घाबरलेला रेडा जवानांच्या अंगावर धावून आला. त्यानंतर त्याला बाहेर काढण्यासाठी फटाके देखील फोडण्यात आले. पण, त्याला तो काही जुमानला नाही. अखेर त्याच्या शिंगांना दोरी बांधून बाहेर काढण्यात आले. यानंतर रेडा आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी देखील सुटकेचा निश्वास सोडला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT