Aguada Fort  Dainik Gomantak
गोवा

Aguada Fort : आग्वाद किल्ला मद्यविक्री प्रकरण; मुख्यमंत्री स्वत: घालणार लक्ष

विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ मार्चपासून

गोमन्तक डिजिटल टीम

Aguada Fort : विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 मार्च रोजी बोलवण्यात आले असून एक आठवडा चालणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळत बैठकीत मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी दिली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

सत्तरी तालुक्यातील चार पंचायतींना साहित्य पुनर्प्राप्ती सुविधा (एमआरएफ) यासाठी सरकारी जमीन हस्तांतरित केली आहे. त्याशिवाय सौर ऊर्जा धोरण 2017 दुरुस्ती मंजूर केली आहे. गुरे व्यवस्थापन योजने अंतर्गत आणखी दोन नवीन वाहन खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. असलेल्या निधीतून ही वाहने खरेदी केली जाईल, असे डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.

आग्वाद किल्ल्याच्या विषयात लक्ष घालणार

नूतनीकरण केलेला आग्वाद किल्ला आणि संग्रहालयात उघडण्यात आलेल्या मद्यालयावरून सध्या सरकारवर जबर टीका होत आहे. गोव्याच्या मुक्तिलढ्याशी संबंधित वास्तूत बार खुला करून स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान झाल्याच्या प्रतिक्रिया व्‍यक्त होत आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना विचारले असता ‘आपण त्‍यात लक्ष घालणार आहे’ अशी त्रोटक प्रतिक्रिया त्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mopa Airport : मोपा विमानतळ विकास की कासारवर्णे गावाचा विनाश ? ग्रामस्थ संतप्त ; पावसाळ्यात उद्‍भवते पूरसंकट

Yuti Yog 2026: "शुक्र-गुरुच्या युतीने चमकणार नशिबाचा तारा!" पैसा, प्रतिष्ठा अन् मालमत्तेचे व्यवहार होणार फत्ते; 4 राशींसाठी युती योग ठरणार वरदान

VIDEO: "मैदानात षटकार, स्टँड्समध्ये हाहाकार!" प्रियांश आर्याच्या शॉटनं चाहता जखमी; रक्तानं माखलेला व्हिडिओ व्हायरल

सत्तरीतील बंधारे बनले मद्यपींचे अड्डे! नदीपात्रात बाटल्यांचा खच आणि हुल्लडबाजी; उस्ते गावात मद्यपींचा धिंगाणा

Goa University : ‘बीए-एलएलबी एन्‍ट्रन्‍स’ निकालात पुन्‍हा घोळ; पालक साशंक, विद्यापीठाने बदलली 9 विद्यार्थ्यांची मेरीट लिस्‍ट

SCROLL FOR NEXT