BSNL Tag Block Theft Dainik Gomantak
गोवा

BSNL Tag Block Theft: 'बीएसएनएल'ला चोरांचा दणका, सासष्टीत टॅग ब्लॉकची चोरी; दूरध्वनी, इंटरनेट सेवा विस्कळीत

BSNL equipment stolen Salcete: सासष्टी तालुक्यातील कोलवा, फातोर्डा व दवर्ली परिसरात बीएसएनएलच्या दूरसंचार पायाभूत सुविधांना लक्ष्य करताना चोरांनी पिलर कॅबिनेट फोडून टॅग ब्लॉक लंपास केल्याचे उघडकीस आले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: सासष्टी तालुक्यातील कोलवा, फातोर्डा व दवर्ली परिसरात बीएसएनएलच्या दूरसंचार पायाभूत सुविधांना लक्ष्य करताना चोरांनी पिलर कॅबिनेट फोडून टॅग ब्लॉक लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे २६० पेक्षा जास्त ग्राहकांची दूरध्वनी व इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे.

कोलवा येथील डिअर राईस बाऊल रेस्टॉरंटजवळील बीएसएनएलचे पिलर कॅबिनेट फोडून अज्ञातांनी आतील तारा कापून टॅग ब्लॉक चोरून नेले. १ ते १९ सप्टेंबरदरम्यान ही घटना घडली होती.

बीएसएनएलच्या कनिष्ठ दूरसंचार अधिकारी वंदना नाईक यांच्या तक्रारीवरून कोलवा पोलिसांनी याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या घटनेत सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले असून ५२ ग्राहकांची सेवा खंडित झाली आहे. उपनिरीक्षक प्रथमेश महाले याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

दुसऱ्या घटनेत, फातोर्डा येथील विद्यानगरमधील संचयनी हाऊसिंग कॉलनी तसेच ब्रिटो सर्कल येथील अलिस्टर टायर सर्व्हिससमोरील बीएसएनएलचे पिलर कॅबिनेट १७ सप्टेंबरपूर्वी चोरांनी फोडले व टॅग ब्लॉक चोरी केली. यामुळे परिसरातील ९५ ग्राहकांच्या दूरध्वनी व इंटरनेट सेवांवर परिणाम झाला. कनिष्ठ अभियंता चंद्रकांत मारुती घस्ते यांच्या तक्रारीवरून फातोर्डा पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून, उपनिरीक्षक सत्त्वशील देविदास पुढील तपास करत आहेत.

अन्य एका घटनेत मायणा-कुडतरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दवर्ली झरीवाडा, दत्त मंदिर व मारुती मंदिर परिसरातील तीन बीएसएनएल पिलर चोरांनी फोडले. १३ ते १७ सप्टेंबरदरम्यान झालेल्या या चोऱ्यांमुळे सुमारे १२० ग्राहकांची सेवा विस्कळीत झाली आहे. यात बीएसएनएलचे सुमारे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. कनिष्ठ दूरसंचार अधिकारी सान्वी अभय देसाई यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवली असून, उपनिरीक्षक नारायण पिंगे पुढील तपास करत आहेत.

अज्ञातांवर गुन्हा दाखल

सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून दूरसंचार सेवा विस्कळीत केल्याप्रकरणी तिन्ही घटनांमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२),३२४ (२),सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायदा कलम ३ तसेच दूरसंचार कायदा कलम ४२ (५) अन्वये अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ठिकाणे तीन, चोरीची पद्धत एकच

या चोरी प्रकरणामुळे बीएसएनएलचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी या तिन्हीही ठिकाणच्या पोलिस ठाण्यांत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, सर्व ठिकाणी चोरीची पद्धत एकसारखीच असल्याने एकाच टोळीचे हे काम असावे, असा पोलिसांना दाट संशय आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपासकामाला सुरुवातही केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: फक्त निवडणुका आल्यावर यात्रा काढून उपयोग नाही! 'भाजप जनतेसोबत' म्हणत दामू नाईकांचा काँग्रेसला सणसणीत टोला

UN General Assembly: 'दिवसा सुरक्षेची भाषा, रात्री आतंकवाद...!', संयुक्त राष्ट्रात भारताचा पाकड्यांना दणका; अल्पसंख्याकांवरील अत्याचारावरुनही सुनावले खडे बोल

खरी कुजबुज: 'खाओ पीओ' काँग्रेस बैठक

Goa Cricket Association: प्रशांत काकोडेंचे 'आयसीए' सदस्यत्व निलंबित, जीसीए नैतिक अधिकारी-लोकपालाकडून कारवाई

Goa Politics: युतीच्या गोष्टी केवळ वाऱ्यावर, वेणुगोपाल यांच्या बैठकीत 'गोवा राखण यात्रे'वरच चर्चा

SCROLL FOR NEXT