Pernem Crime Dainik Gomantak
गोवा

Pernem Crime News: पेडण्यात अनोळखी तरूणीचा निर्घृण खून; शीर धडावेगळे करत केले चार तुकडे...

परिसरात खळबळ; पोलिसांसमोर गुढ उकलण्याचे आव्हान

Akshay Nirmale

Pernem Crime News: गोव्यातील पेडणे तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पेडण्यात एका तरूणीचा शीर धडावेगळे केलेला मृतदेह आढळून आला आहे.

या तरूणीच्या मृतदेहाचे चार तुकडे केले गेले आहेत. या धक्कादायक प्रकारने नागरिकांमध्ये खळबळ माजली आहे.

शवविच्छेदन अहवालात हा मृतदेह 30 वर्षीय तरूणीचा असावा, असे म्हटले आहे. या तरूणीची अद्याप ओळख पटलेली नाही. पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पाडोर्से-पेडणे रेल्वे मार्गाजवळ तरूणीचे शीरर आढळून आले होते. तर काही दिवसांपुर्वी पेडण्यात या मृतदेहाचा एक हात आणि एक पाय आढळून आला होता.

हे तुकडे पोलिसांनी गोमॅकोमध्ये तपासणीसाठी पाठवले होते.

त्यावर डॉक्टरांनी आणखी तुकडे मिळतात का, याची पाहणी करण्यास सांगतिले होते.

पोलिसांनी आणखी तपास केला असता दुसरा पाय सापडला. त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी दुसरा हातही सापडला. त्यानंतर या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.

मृतदेहाचे हे तुकडे सडलेल्या अवस्थेत होते. पाच दिवसांपासून हे तुकडे सापडले आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य पाहता पोलिस दलही कामाला लागले आहे.

या अनोळखी तरूणीच्या मृतदेहाचे गुढ उकलण्याचे आव्हान गोवा पोलिसांसमोर आहे.

राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचे समजते. या मृतदेहाच्या शवविच्छेदनानंतर गोमॅकोमध्ये या अधिकाऱ्यांनी मृतदेहाची पाहणी करून पोलिसांना तपासाबाबत विविध सूचना दिल्याचेही कळते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: ज्येष्ठ कोंकणी साहित्यिक मीना काकोडकर यांचे निधन!

Goa Drugs Case: गोव्यात डीजे रशियन महिलेकडे सापडले 17 लाखांचे अंमलीपदार्थ! छाप्यात मिळाले नव्या प्रकारचे ड्रग्ज

Zuari Accident: दुर्दैवी! नवीन झुआरी पुलावर झालेल्या दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू; अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल चालकास अटक

Romi Konkani: रोमी कोंकणी, मराठी वादावर दत्ता नायकांचे मोठे विधान! पहा...

Goa Congress: ‘इफ्फी’ म्हणजे चरण्याचे कुरण! देशी महोत्सवात पतन झाल्याचे काँग्रेसचे घणाघाती आरोप

SCROLL FOR NEXT