Vasco Dainik Gomantak
गोवा

Vasco: भावाच्या अंत्ययात्रेवेळी पोचली राखी; रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला वास्कोत बहिणींच्या अश्रूंचा फुटला बांध

Vasco Raksha Bandhan Tragedy: रक्षाबंधन हा बहीण-भावाच्या पवित्र व अतूट प्रेमाचा सण. अशा आनंदमय सणासाठी बहिणीने प्रेमाच्या ओलाव्याने पोस्टाद्वारे पाठविलेली राखी थेट भावाच्या अंत्ययात्रेवेळीच पोचली.

गोमंतक ऑनलाईन टीम

दाबोळी: रक्षाबंधन हा बहीण-भावाच्या पवित्र व अतूट प्रेमाचा सण. अशा आनंदमय सणासाठी बहिणीने प्रेमाच्या ओलाव्याने पोस्टाद्वारे पाठविलेली राखी थेट भावाच्या अंत्ययात्रेवेळीच पोचली. मनगटावर राखी बांधण्याऐवजी दोन बहिणींना साश्रू नयनांनी भावाला अखेरचा निरोप द्यावा लागल्याने त्यांच्या दु:खाला पारावार राहिला नव्हता.

ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली सडा-वास्को येथे. ‘एमपीए’च्या कार्यालयात काम करणाऱ्या ४४ वर्षीय विवाहित तरुणाला एकूण तीन बहिणी. त्यापैकी एक विदेशात आहे. पैकी पेडणे तालुक्यातील केरी येथील बहिणीने राखी पौर्णिमेनिमित्त काही दिवसांपूर्वी त्याला स्पीड पोस्टद्वारे राखी पाठविली होती.

मात्र, दुर्दैवाने हृदयविकारामुळे या तरुणाचे बुधवारी रात्री १२ वाजता निधन झाले. त्यामुळे (गुरुवारी) सकाळी त्याच्या गोव्यातील दोन्ही बहिणींना नातेवाईकांनी सडा -वास्को येथे बोलावून घेतले. भावाच्या निधनामुळे शोकाकुल वातावरण असतानाच अंत्ययात्रेवेळी बहिणीने पाठविलेली राखी पोस्टमन तेथे घेऊन आल्याने बहिणींच्या अश्रूंचा बांध फुटला. यावेळी उपस्थित नातेवाईकांनी राखी न स्वीकारता ती परत पाठवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'चा जबर दणका! पाक एअरफोर्सचा एअरबेस अजूनही कोमात; सॅटेलाइट कॅमेऱ्यानं पकडली पाकड्यांची चोरी

CCTV Mandatory in medical: औषध दुकानांवर आता सीसीटीव्हीची नजर! H, H-1 आणि X औषधांच्या विक्रीवर नियंत्रणासाठी केंद्राचा मोठा प्रस्ताव

Porvorim Elevated Road: पर्वरी उन्नत मार्गावर अपघात, पाणी साचण्याच्या समस्येवर 'आप'चा हल्लाबोल

Adam Zampa Record: कांगारुचा नवा 'किंग ऑफ स्पिन'! ॲडम झाम्पा ठरला ऑस्ट्रेलियाचा नंबर 1 स्पिनर; शेन वॉर्नचा मोडला मोठा रेकॉर्ड

Iron Ore Mining Goa: कोडली खाणीला पर्यावरणीय मंजुरीपूर्वी मोठी सुनावणी; 377 हेक्टर क्षेत्रात 35 लाख टन लोहखनिज उत्खननाचा प्रस्ताव

SCROLL FOR NEXT