Influenza Fever Goa: ताप आलाय? भिवपाची गरज ना! गोव्यात इन्फ्लूएंझाचे 73 हून अधिक रुग्ण; 'या' लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करु नका

Influenza Cases In Goa: राज्यात मागील काही दिवसांपासून इन्फ्लूएंझा (संसर्गजन्य ताप)च्या रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असल्याचे समोर आले आहे.
Influenza Cases In Goa
Influenza Fever GoaDainik Gomantak
Published on
Updated on

राज्यात मागील काही दिवसांपासून इन्फ्लूएंझा (संसर्गजन्य ताप)च्या रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत ‘इन्फ्लूएंझा’बाधित सुमारे ७३ हून रुग्णांची नोंद झाली आहे. मागील तीन आठवड्यांपासून रुग्णालयांमध्ये दररोज श्वसनाचा त्रास असलेले ५ ते १० रुग्ण उपचारासाठी येत आहेत.

यातील बहुतांश रूग्णांना स्वाईन फ्ल्यू आणि काही रूग्णांमध्ये कोरोनाची लागण दिसून येत आहे. परंतु नागरिकांनी घाबरून जायचे कारण नसल्याचा तज्ज्ञ सल्ला देत आहेत. यापूर्वी २०१९ साली स्वाईन फ्ल्यूची लाट आली, कोरोनाबाबत सर्वांनाच कल्पना आहे, त्यामुळे इन्फ्लूएंझा ताप झाल्यास त्याला लागणारी प्रतिकारशक्ती गोमंतकीयांमध्ये आहे. इन्फ्लूएंझा झाल्यास योग्य काळजी आणि आराम घेणे जरूरीचे आहे.

Influenza Cases In Goa
Goa Education: क्रमवारी वाढली, आता गुणवत्ता उंचावू दे! शिक्षणात गोव्याची पायाभूत कामगिरी भक्कम

महत्त्वाचा सल्ला

निरोगी प्रौढांमध्ये इन्फ्लूएंझा सहसा आपोआप बरा होतो. पुरेशी विश्रांती, भरपूर द्रवपदार्थ पाणी, सूप इ. आणि लक्षणांनुसार उपचार घेतल्यास लवकर आराम मिळतो.

लक्षणे ५ ते ६ दिवसांत कमी न झाल्यास, लहान बाळ किंवा वृद्धांमध्ये लक्षणे दिसल्यास, किंवा इतर जुने आजार असल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या किंवा जवळच्या सरकारी आरोग्य केंद्राला भेट द्या.

संसर्ग होऊ नये यासाठी

१ हात वारंवार धुणे गरजेचे

२ खोकताना किंवा शिंकताना तोंड आणि नाक झाका

३ तब्येत बरी नसल्यास ताप आल्यास घरीच राहा

४ पुरेशी विश्रांती घ्या आणि भरपूर पाणी प्या

Influenza Cases In Goa
Goa Police: पोलिसांचा धाक हवा, भीती नको! मायणा-कुडतरीपासून-फोंड्यापर्यंतच्या घटनांनी 'खाकी'च्या कार्यपद्धतीवर गंभीर सवाल

इन्फ्लूएंझाची प्रमुख लक्षणे

सुस्ती आणि भूक न लागणे

खोकला आणि घसा खवखवणे

मळमळ आणि उलट्या

सांधेदुखी आणि स्नायूदुखी

वाहणारे नाक / सर्दी

ताप, डोकेदुखी

अतिसार/जुलाब

कोणाला अधिक धोका?

लहान मुले

ज्येष्ठ नागरिक

मधुमेही

हृदय आणि मूत्रपिंडाचे विकार असलेले रुग्ण

Influenza Cases In Goa
Goa Politics: काँग्रेसचे 'तिकीट' विक्रीसाठी? नुवेच्या उमेदवारीवरून भाजपचा थेट सवाल; कार्यालयाच्या जागेच्या व्यवहाराबाबत मागितला खुलासा

संसर्ग रोखण्यासाठी काय काळजी घ्यावी?

१ तोंड आणि नाक झाका : खोकताना किंवा शिंकताना रुमाल वा टिश्यूचा वापर करा.

२ मास्क वापरा : श्वसनाचा त्रास किंवा सर्दी-खोकला असल्यास इतरांच्या सुरक्षेसाठी मास्क घाला.

३ हात वारंवार धुवा : हात साबणाने स्वच्छ धुवा किंवा हँड सॅनिटायझरचा वापर करा.

४ चेहऱ्याला हात लावणे टाळा : अस्वच्छ हातांनी डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करू नका.

५ गर्दीची ठिकाणे टाळा: आजारी असल्यास वा ताप असल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.

६ लवकर वैद्यकीय सल्ला घ्या: लक्षणे आढळल्यास पहिल्याच दिवशी डॉक्टरांचा सल्ला घ्या; स्वतःच्या मनाने औषधे घेणे टाळा.

७ लसीकरण: ज्येष्ठ नागरिक आणि जोखीम असलेल्या गटातील व्यक्तींनी फ्ल्यू व न्यूमोकोकल लस घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

लस गरजेची

इन्फ्लूएंझा चे रुग्ण वेगाने वाढत असून फ्ल्यूची लस विषाणूचा तीव्र संसर्ग रोखण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते. ही लस शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला निष्क्रीय किंवा मृत विषाणू घटकांची ओळख करून देते. लस घेतल्यानंतर साधारण २ आठवड्यांत विषाणूविरुद्ध लढणारी प्रथिने (अँटीबॉडीज) तयार होतात. लस घेतलेल्या व्यक्तीला फ्लू झाल्यासही त्याचे गंभीर आजार, न्युमोनिया, रुग्णालयात दाखल होणे किंवा मृत्यूपासून संरक्षण होते.

Influenza Cases In Goa
Goa Assembly Election: गोव्यात विरोधकांच्या आघाडीची जोरदार तयारी! काँग्रेसची 'आरजी', 'आप'सोबत दोन दिवसांत चर्चा; गोवा फॉरवर्डशीही बोलणी करण्याचे चोडणकरांचे संकेत

लस घेताना कोणती काळजी घ्यावी?

आधी घेतलेल्या लसीमुळे अ‍ॅलर्जी झाली असल्यास, लस घटकांची अ‍ॅलर्जी असल्यास किंवा ‘गुइलेन-बॅरे सिंड्रोम’ चा इतिहास असल्यास आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Prison Corruption Allegations
Goa Government Job Opportunities
Goa police Misconduct Cases
Goa Name Change Law 1990
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com