Dabolim Airport Dainik Gomantak
गोवा

Dabolim Airport: व्हिलचेअरसाठी खंडणी प्रकरण! दाबोळी विमानतळाच्या संचालकांना नोटीस

दाबोळी विमानतळ संचालकांना 13 फेब्रुवारी किंवा त्यापूर्वी आयोगाकडे केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

Pramod Yadav

दाबोळी विमानतळावर (Dabolim Airport) दिव्यांग असलेल्या एका ज्येष्ठ परदेशी महिलेकडून व्हिलचेअरसाठी खंडणी घेतली असल्याचा प्रकार समोर आला आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरीस ही घटना घडली असून, इंग्लंडची रहिवाशी असलेल्या या महिलेने विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

या प्रकरणाची दखल आता गोवा राज्य दिव्यांग व्यक्ती आयोगाने देखील घेतली असून, आयोगाने दाबोळी विमानतळाच्या संचालकांना नोटीस बजावली आहे. दाबोळी विमानतळ संचालकांना 13 फेब्रुवारी किंवा त्यापूर्वी आयोगाकडे केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

कॅथरीन फ्रान्सिस वुल्फ यांच्या वतीने मिखिल वसंत यांनी आयोगाकडे याचिका दाखल केली होती. दरम्यान, आयोगाने याची दखल घेतली आहे. दाबोळी विमानतळावरील घटना अपंग व्यक्तींचे हक्क कायदा, 2016 चे उल्लंघन करणारी आहे. असे आयोगाने आपल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.

RPwD कायद्याच्या कलम 3 आणि 4 अन्वये अपंग व्यक्ती अथवा महिलांशी भेदभाव न करता आणि सभ्यपणे वागणूक दिली पाहिजे. असेही या नोटीसमध्ये म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

कॅथरिन फ्रान्सेस वोल्फ (वय 62) या दिव्यांग असलेली ज्येष्ठ महिला 29 जानेवारी 2023 रोजी गोव्यातून इंग्लंडला प्रवास करणार होत्या. दाबोळी विमानतळावर त्यांना व्हिलचेअरचा वापर करण्यासाठी त्यांच्याकडून 4,000 रूपये खंडणी घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विमानतळावर त्यांच्यासोबत झालेल्या गैरव्यव्हार प्रकरणी त्यांनी विमानतळ पोलिस, दक्षिण गोवा पोलिस आणि पोलिस महासंचालक यांच्याकडे तक्रार केली आहे. कॅथरिन यांना नैराश्याचा देखील त्रास असल्याची माहिती समोर आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: धक्कादायक! वडिलांवर धारदार शस्त्राने वार करून मुलाने संपवले जीवन; उसगावात खळबळ

Rashi Bhavishya 14 November 2024: व्यवसायातून खास फायदा होईल, आपल्या दिलदार स्वभावामुळे लोकं प्रसन्न राहतील; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Cash For Job Scam: 'मुख्यमंत्र्यांनी नोकरीत घोटाळा करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी', नरेश सावळ यांचे आवाहन

Cuncolim IDC: कुंकळ्ळी औद्योगिक वसाहत होणार दुर्गंधीमुक्त! पोलाद कारखाना, वृक्ष लागवडीसाठी होणार सांडपाण्‍याचा पुनर्वापर

'Cash For Job' ची दिल्लीत चर्चा! नोकर भरतीसंदर्भात श्‍वेतपत्रिका काढा; काँग्रेस सचिव शर्मा कडाडले

SCROLL FOR NEXT