Dainik Gomantalk
गोवा

दगाबाज रे...! होणाऱ्या नवर्‍याला दाखवला ठेंगा, लग्नमंडपातून बॉयफ्रेंडसोबत नवरी पसार; फोंड्यातील घटनेने खळबळ

Ponda: दोन दिवसांपूर्वी फोंड्यात एक लग्न समारंभ आयोजित केला होता. लग्नघटिका जवळ आली होती; पण ऐनवेळी नवरी मुलगी वधूवेषातच प्रियकरासोबत पळून गेली. बिचाऱ्या नवरदेवाला आपल्या कुटुंबासह मान खाली घालून लग्न मंडपातून घरी परतावे लागले, तेही वधूच्या आततायी निर्णयामुळे!

गोमन्तक डिजिटल टीम

Ponda Marriage Bride Escape Incident

फोंडा: ‘तन्‍नू वेड्स मनू’, ‘जब वुई मेट’, ‘थ्री इडिएट्स’ या गाजलेल्‍या चित्रपटांतील कथानकांप्रमाणेच एक प्रसंग नुकताच गोव्‍यातही घडला. दोन दिवसांपूर्वी फोंड्यात एक लग्न समारंभ आयोजित केला होता. लग्नघटिका जवळ आली होती; पण ऐनवेळी नवरी मुलगी वधूवेषातच प्रियकरासोबत पळून गेली. बिचाऱ्या नवरदेवाला आपल्या कुटुंबासह मान खाली घालून लग्न मंडपातून घरी परतावे लागले, तेही वधूच्या आततायी निर्णयामुळे!

काही दिवसांपूर्वी मुला-मुलीने एकमेकांना पाहिले आणि पसंतही केले. रिवाजानुसार पै-पाहुणांच्या उपस्थितीत साखरपुडाही झाला. सगळं काही बरं चाललं होतं! अखेर लग्न ठरलं लग्नाचा दिवसही उजाडला. दोन्ही बाजूची वऱ्हाडी मंडळी नियोजित मंडपात पोचली. नवरा मुलगा हातात हार घेऊन तयार.

एका छान सजलेल्या कारमधून नवरी मंडपाच्या दारात उतरली. त्याचवेळी सर्वांना धक्का देणारी घटना घडली. दुसरी एक कार नवरीच्या कारपुढे अचानक उभी राहिली अन् डोळ्यांचे पाते लवते न लवते, तोच वधूवेशातील नवरी मुलगी त्या दुसऱ्या कारमध्ये बसली आणि प्रियकरासोबत पळून गेली.

हजारभर लोकांच्या जेवणाची सोय; पण...

या लग्न सोहळ्यानिमित्त हजारभर लोकांच्या जेवणाची सोय करण्यात आली होती; पण तेथे अनपेक्षितपणे जो प्रकार घडला, तो पाहून कुठलं जेवण आणि कुठलं काय? नवरीकडील मंडळीकडून यावर काहीच उत्तर आले नाही. बिच्चारा नवरदेव हताश होऊन बसला होता. नवरा मुलगा आणि त्याच्या कुटुंबीयांना बराच मन:स्ताप सहन करावा लागला, तोही वधूच्या एका विश्‍वासघातकी निर्णयामुळे.

बाका प्रसंग टळला असता

लग्न ठरविण्यापूर्वीच संबंधित मुलीने जर आपले दुसऱ्यावर प्रेम आहे हे घरच्यांना सांगितले असते, तर तिच्या आणि नवरदेवाच्याही कुटुंबीयांची नाचक्की नक्कीच टळली असती, अशी चर्चा लग्नस्थळी सुरू होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT