Curfew in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Curfew: हॉटेल, रेस्‍टॉरंटचालकांची मनमानी, शिथिलतेचा गैरफायदा

गोवा(Goa) व्यावसायिकांकडून संचारबंदी (Curfew) शिथिलतेचा गैरफायदा घेण्याचे प्रकार सुरू आहेत.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यातील (Goa) हॉटेल्‍स (Hotel) व रेस्टॉरंट (Restaurant) चालकांनी सरकारला (Goa Government) वारंवार विनंती केल्यानंतर संचारबंदी (Curfew) शिथील केली. सकाळी 7 वा. ते रात्री 9 वा.पर्यंत 50 टक्के क्षमतेने ग्राहकांसाठी खुले करण्याची परवानगी दिली. मात्र, व्यावसायिकांकडून संचारबंदी शिथिलतेचा गैरफायदा घेण्याचे प्रकार सुरू आहेत. अनेक ठिकाणी रात्री 9 वा.ची वेळ टळून गेली, तरी 10.30 ते 11 वा.पर्यंत ती खुली ठेवतात. बार व रेस्‍टॉरंट तसेच फास्ट फूडवाल्‍यांकडून नियमांचे उल्लंघन केले जात आहे. (break the rules of curfew by hotel and restaurant operators in Goa)

दुसरीकडे कपडे व इतर वस्तूंची दुकाने सकाळी 7 ते सायं. 6 वा.पर्यंत खुली ठेवण्याची मुभा असताना बहुतांश दुकाने रात्री 8 वाजेपर्यंत खुली ठेवली जात आहेत. पोलिस अशा दुकानांवर किवा रेस्‍टॉरंटविरुद्ध कारवाई करत नसल्याने नियमांचे उल्लंघन होत आहे. 5 जुलै रोजीची संचारबंदी संपल्यानंतर 12 जुलै रोजी सकाळी 7 वा.पर्यंत त्‍यात वाढ केली आहे.

दिलासा देऊनही आणखी हव्‍यास

तब्‍बल सव्वा वर्ष कोरोनाच्या संकटामुळे व्यवसाय नसलेली व कोरोना काळात बंद असलेल्या दुकानदारांना सरकारने दिलासा देताना दुकानांची वेळ 3 वरून 6 वा.पर्यंत केली. तसेच गेले काही महिने बंद असलेल्या लहान हॉटेल्स व रेस्टॉरंटना रात्री 9 वा.पर्यंत सवलत देण्यात आली. त्यानंतर फक्त किचन सुरू ठेऊन पार्सल सेवा देण्याची परवानगी दिली. मात्र, रेस्‍टॉरंट चालक वेळ टळून गेल्यानंतरही ती सुरूच ठेवतात. तसेच फास्ट फूड चालक रात्री 9 नंतरही ग्राहकांना सेवा देतात, असेही उघड झाले आहे.

गाडेचालकांत संभ्रम

4 जुलै रोजी काढलेल्या अधिसूचनेत गाडेचालकांना थेट सवलत देण्यात आली नव्हती. त्यामुळे मिरची पाव, भेलपुरी व ऑम्‍लेट विकणाऱ्या काही गाडेचालकांनी अद्याप आपले गाडे उघडलेले नाहीत. मात्र, रेस्‍टॉरंटच्‍या वेळेत कोरोना नियमांचे पालन करून गाडे उघडण्यास हरकत नाही, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

"राज्यातील दुकाने सायं. 6 वा. व लहान हॉटेल व रेस्टॉरंट रात्री 9 वा. बंद करण्याची अधिसूचना काढली आहे. ज्‍याच्‍याकडून नियमांचे उल्लंघन होईल, त्‍याच्‍याविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. "

- अजित रॉय, उत्तर गोवा जिल्हाधिकारी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT