पणजी: गॅस सिलेंडर त्याचबरोबर पेट्रोल व डिझेलच्या दरामध्ये झालेल्या भरमसाठ वाढीच्या विरोधात आज गोवा प्रदेश महिला काँग्रेस (Goa Pradesh Women's Congress) आणि गोवा प्रदेश युवा काँग्रेस यांच्यातर्फे संयुक्तपणे एका मोर्चाचे आयोजन करण्यात आले. काँग्रेस कार्यालय ते आझाद मैदान असा हा मोर्चा निघाला. काँग्रेसच्या महिला विभागाच्या अध्यक्ष बिना नाईक, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) व युवा शाखेचे अध्यक्ष एडवोकेट वरद म्हार्दोळकर (Varad Mhardolkar) यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चामध्ये महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.
ढोल व ताशाच्या सहाय्याने हा मोर्चा काढण्यात आला. मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देत , इंधनाचे दर कमी करा, गॅसची दरवाढ कमी करा . अशी जोरदार मागणीही यावेळी मोर्चेकऱ्यांनी केली. यावेळी बोलताना गिरीश चोडणकर यांनी सांगितले की केंद्रामध्ये सत्तेवर असलेल्या सरकारने गेल्या पाच वर्षांमध्ये ५० पेक्षा जास्त वेळा पेट्रोल, डिझेल आणि गॅसची दरवाढ केली आहे. त्यामुळे अच्छे दिन कहा गये ? असे म्हणायची पाळी सर्वसामान्य भारतीयावर आलेली आहे.
वाढलेली दरवाढ मागे घेऊन सर्वसामान्यांना दिलासा देण्याची मागणी गिरीश चोडणकर यांनी केली. तर बिना नाईक यांनी गॅस, पेट्रोल व इतर पदार्थांच्या दरवाढीमुळे महिलांना फारच त्रास होत असून कोरोना काळामध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या असतानाही झालेली दरवाढ निषेधार्थ असल्याचे नाईक म्हणाल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.