Kadamba Bus Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon 2023 : पालयेत धावत्‍या कदंब बसमध्‍ये घुसली फांदी

झाड पडले; विद्यार्थी थोडक्यात बचावले, शिवोलीतील प्रकार

गोमन्तक डिजिटल टीम

मार्ना-शिवोली येथे सोमवारी संध्याकाळी सरिता च्यारी यांच्या कौलारू घरावर वादळी वाऱ्यामुळे भलेमोठे आंब्याचे झाड कोसळले. यावेळी घरात शिकवणीसाठी आलेल्या चार विद्यार्थ्यांच्‍या अंगावर कौले पडल्याने ती थोडक्यात बचावली.

झाड हटवेपर्यंत ही मुले घरातच अडकून पडली होती. काही मुले जखमी झाल्याने स्थानिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारांनंतर त्यांना घरी पाठवण्यात आले. तर पालये येथे धावत्‍या कदंब बसमध्‍ये झाडाची फांदी घुसली. सुदैवाने चालक बचावला.

राज्यात सलग सातव्या दिवशी मुसळधार पाऊस कायम असून, पडझडीच्या घटना सुरूच आहेत. अनेक ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले. कडशी नदीचा प्रवाह कमी झाला असला तरी धोका कायम आहे.

पारोडा येथील रस्ता पाण्याखाली गेला. राज्यात गेल्या २४ तासांत ७४.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, उद्या हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. कुशावती नदीला पूर आल्याने पारोडा येथील पूल व मुख्य रस्ता दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला.

या रस्त्यावरील वाहतूक गुडी ते चांदरमार्गे वळविण्यात आली. धावे येथे माड पडून दोन कारचे नुकसान झाले. वाळपई अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. विनोद उसपकर, महादेव उसपकर यांच्‍या कारचे सुमारे २ लाखांचे नुकसान झाले; तर २५ लाखांची मालमत्ता वाचविण्यात अग्निशमनच्या जवानांना यश आले.

घरावर झाड पडून चार विद्यार्थी जखमी

मार्ना-शिवोली येथे सोमवारी संध्याकाळी सरिता च्यारी यांच्या कौलारू घरावर भलेमोठे आंब्याचे झाड कोसळल्याने घरात शिकवणी घेण्यासाठी आलेले चौघे विद्यार्थी अंगावर कौले पडल्याने जखमी झाले.

जखमी विद्यार्थ्यांवर स्थानिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर घरी पाठवण्यात आले. दरम्यान, म्हापसा अग्निशमन दलाला या घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन झाड कापून घरात अडकलेल्या विद्यार्थ्यांची सुटका केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT