BPS Election 2023 Dainik Gomantak
गोवा

BPS Club Election 2023: वॉलफँगो पॅनल पराभूत : प्रतिष्‍ठेच्‍या बीपीएस क्लब निवडणुकीत कामत गटाला पूर्ण बहुमत

गोमन्तक डिजिटल टीम

BPS Club Election 2023: मडगावमधील अत्‍यंत जुन्या व प्रतिष्ठेच्या बीपीएस क्लबची निवडणूक आज रंगतदार वातावरणात झाली.

या निवडणुकीत मडगावचे आमदार दिगंबर कामत यांचे सुपुत्र योगिराज कामत आणि आब्रेऊ ऑस्कर वॉलफॅंगो यांच्या दोन पॅनलमध्ये जबरदस्त चुरस होती. मात्र, कामत गटाचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले.

आपले पॅनल जिंकेल याची खात्री होती, असे योगिराज यांनी सांगितले. राजकीय मनीषा बाळगून मार्गक्रमण करणाऱ्या कामत यांच्‍यासाठी ही पहिली परीक्षा मानली जात होती.

नवीन क्लब हाऊस, क्लबची दुरुस्ती, नूतनीकरण व अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे योगिराज म्हणाले. या निवडणुकीसाठी बीपीएस क्लबचे १,१२५ सभासद पात्र होते.

त्यातील ५९९ सभासदांनी मतदानात भाग घेतला. नऊ जागांसाठी एकूण २१ उमेदवार रिंगणात होते.

त्यातील कामत गटाचे ज्युस्त कॉस्ता यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड पूर्वीच करण्यात आली होती. उपाध्यक्षपदी इयान कार्ल आरावजो आल्वारीस यांची निवड झाली.

कामत गटाचे निवडून आलेले उमेदवार -

दा कॉस्ता फ्रॅंन्स्की (४३५) दोरादो वोलुसियानो (४०७), संतोष जॉर्ज (४८३), योगिराज कामत (४७२), मांगिरीश कुंदे (४७९), चिराग नायक (४६९), सुनीत पिंटो (४५९), शशांक शिरवईकर (४०३), विक्रम वेर्लेकर (४९५).

आम्‍हाला पाठिंबा देणाऱ्या साऱ्यांप्रति कृतज्ञता व्‍यक्‍त करतो. आमच्‍या पॅनेलने ९-० अशा बहुमताने विजय मिळवला. मला सर्वाधिक ४८५ मते मिळाली. वचन दिल्याप्रमाणे पूर्ततेसाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू.
विक्रम वेर्लेकर

नेते राजकीय, पण राजकारण नाही!

या निवडणुकीत आमदार कामत यांचे सुपुत्र योगिराज यांचे पॅनल असल्याने निवडणुकीला बरेच महत्त्व प्राप्त झाले होते. फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई, हळदोण्याचे आमदार कार्लुस फेरेरा तसेच इतर राजकीय नेत्यांनी भाग घेतला होता.

मात्र, सर्वांनीच या निवडणुकीत राजकारण नसल्याचे सांगितले. मला जे उमेदवार योग्य वाटले, त्यांना मतदान केले. मतदान करताना मी पॅनल पाहिले नाही, असे आमदार फेरेरा म्हणाले.

हा मडगावातील प्रतिष्ठित क्लब असून त्याचे हजारो सभासद आहेत. मी नगरनियोजन मंत्री असताना मडगावमधील एमसीसी, क्लब हार्मोनिया, बीपीएस क्लबला २०० एफएआर मिळवून दिला होता. त्यामुळे क्लबला या जागेचा खूप फायदा झाला.

- विजय सरदेसाई, आमदार, फातोर्डा.

बीपीएस क्लबची ही नियमित निवडणूक आहे. निवडणुकीच्या निमित्ताने आता जरी दोन पॅनल असले तरी एकदा का निकाल जाहीर झाला की सर्व सभासद एकत्र येऊन क्लबच्या भवितव्यासाठी आणि प्रगतीसाठी एकजुटीने काम करतील.
दिगंबर कामत, आमदार, मडगाव.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT