BPCL Cylinder Shortage In Ponda Dainik Gomantak
गोवा

BPCL Cylinder Shortage In Ponda: फोंड्यात ‘बीपीसीएल’ सिलिंडरचा तुटवडा, पाच दिवस सेवा ठप्प

BPCL Cylinder Shortage In Ponda: गेले पाच दिवस हा गॅस पुरवठा बंद झाल्याने ग्राहक एजन्सीच्या कार्यालयात खेटे मारत आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

BPCL Cylinder Shortage In Ponda

फोंड्यात सध्या घरगुती एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने ग्राहक हतबल झाले आहेत. फोंड्यात मार्केटिंग फेडरेशनची भारत गॅस एजन्सी असून त्यामार्फतच फोंड्यातील सुमारे सतरा हजार ग्राहकांना घरगुती गॅसचा पुरवठा केला जातो. मात्र गेले पाच दिवस हा गॅस पुरवठा बंद झाल्याने ग्राहक एजन्सीच्या कार्यालयात खेटे मारत आहेत.

ऐन उन्हाळ्यात तेही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा झाल्याने हीच काय ती ‘मोदीची गॅरंटी‘ असा सवाल सिलिंडर ग्राहकांकडून केला जात आहे.

फोंड्यात घरगुती गॅस सिलिंडरचा तीन कंपन्यांकडून केला जातो, मात्र ‘बीपीसीएल’ कंपनीची एजन्सी असलेल्या मार्केटिंग फेडरेशनमार्फत गॅस सिलिंडर पुरवठा ठप्प झाला आहे. मागच्या पाच दिवसांपासून गॅस सिलिंडरची वाहतूक बंद झाल्याने सिलिंडरवाहू टेंपोचालक बसून आहेत. या प्रकाराची दखल वरिष्ठांनी घ्यायला हवी, असे मत गॅस ग्राहकांकडून केली जात आहे.

महिन्याभरापूर्वी केव्हायसी अर्ज भरण्यासाठी गॅस एजन्सींकडे ग्राहकांची मोठी गर्दी व्हायची. पण हे अर्ज सादरीकरण आवश्‍यक नसल्याचे जाहीर झाल्यानंतर ही गर्दी हटली, पण आता सिलिंडरच नसल्याने ग्राहकांचे हाल झाले आहेत. फोंड्यातील गॅस बूक करणाऱ्या कार्यालयाकडून योग्य नियोजन केले नसल्यामुळेच हा प्रकार उद्भवला असल्याचे ग्राहकांनी सांगितले.

ऑनलाईन बुकींग गरजेचे

भारत गॅसच्या सिलिंडरसाठी ऑनलाईन बुकींग करणे गरजेचे असल्याचे कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांतर्फे सांगण्यात आले. वास्तविक यापूर्वी प्रत्येक ठिकाणी गॅसवाहू सिलिंडरची गाडी आल्यानंतर ग्राहक गॅस सिलिंडर घ्यायचे पण ऑनलाईन बुकिंग गरजेचे असल्याचे मात्र ग्राहकांना सांगण्यात आले नाही.

त्यातच ऑनलाईन बुकींग करण्यासाठी ऑनलाईन सेवा व्यवस्थित असावी लागते, पण फोंडा महालात बऱ्याच ठिकाणी ही सेवा व्यवस्थित नसल्याने ग्राहकांची ससेहोलपट होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: महसूलबुडव्या कंपन्यांचा खाण लिलावात सहभाग, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांची टीका

Goa Contractual Teachers: कंत्राटी शिक्षकांसाठी 'गूड न्यूज'; कायम करण्‍यासाठी सरकार आखणार योजना, अपात्र शिक्षकांना घरी पाठवणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

Rashi Bhavishya 07 August 2025: नवीन ओळखी फायद्याच्या ठरतील, घरातील वादविवाद मिटण्याची शक्यता; एखादी शुभवार्ता मिळेल

Goa Police: गोवा पोलिसांच्या ताफ्यात पाच नवीन पीसीआर व्हॅन, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाटप

Ganesh Festival 2025: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना रेल्वेकडून मोठी भेट; 6 अतिरिक्त विशेष गाड्यांची केली घोषणा!

SCROLL FOR NEXT