AAP On Goa CM: 'आप' नेते कोणालाच घाबरलेले नाहीत, मुख्यमंत्र्यांना 'भिवपाची गरज आसा'

AAP On Goa CM: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘आप’चे नेते घाबरल्याचे विधान केले आहे, परंतु ‘आप’ नेते घाबरले नाहीत. आम्ही प्रामाणिक राजकारण करत आहोत - पालेकर
amit palekar
amit palekar Dainik Gomantak
Published on
Updated on

AAP On Goa CM

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘आप’चे नेते घाबरल्याचे विधान केले आहे, परंतु ‘आप’ नेते घाबरले नाहीत. आम्ही प्रामाणिक राजकारण करत आहोत. त्यामुळे प्रमोद सावंतांना ‘भिवपाची गरज आसा’, असे विधान आपचे गोवा प्रमुख अमित पालेकर यांनी केले.

ते पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी आमदार वेंझी व्हिएगस, वाल्मिकी नाईक व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

पालेकर म्हणाले, ज्यावेळी एखाद्याची भिती वाटते, त्यावेळी ती व्यक्ती स्वप्नातही दिसू लागते, तसे काहीसे तसे काहीसे मुख्यमंत्री सावंतांचे झाले असल्याचे पालेकर यांनी सांगितले. आमदार म्हणाले, आपचे आमदार निवडून आले, तो त्यांना लागलेला मटका असे मुख्यमंत्री म्हणाले.

हा मतदारांचा अपमान आहे. भाजपने देशातील विविध पक्षातील नेत्यांना सीबीआय, ईडी, आयकर विभागाची भिती दाखवून आयात केले आहेत. मद्यघोटाळ्याचा आरोप बिनबुडाचा असून उलट शरदचंद्र रेड्डी यांनी भाजपला पैसे दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

आप पक्षाचे नेते कुणालाच घाबरलेले नाहीत, उलट मोदीच केजरीवालांना घाबरतात. डॉ. सावंतांना भिती आहे की, दोन महिन्यात निवडणुकीनंतर डबल इंजीन बंद पडणार आहे.

त्यानंतर एका इंजिनाने काय करणार? तसेच सत्यपाल मलिकांच्या विधानावरून डॉ. सावंतांना ईडी लागू शकण्याची भिती असल्याने ते घाबरलेले आहेत, असे वाल्मिकी नाईक यांनी सांगितले.

amit palekar
Goa ST Reservation: आधी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची भाषा, आता तटस्‍थ राहण्‍याची आदिवासी मंचची भूमिका

कोपरा बैठक

इंडिया आघाडीचा उमेदवार अजून जाहीर झालेला नाही, परंतु आघाडीचे घटक असलेल्या आपद्वारे राज्यातील विविध भागात इंडिया आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी बैठका घेतल्या जात आहे. पणजीतील कोपरा बैठकीत मार्गदर्शन करताना आपनेते वाल्मिकी नाईक, आमदार व्हेंजी विएगश, अमित पालेकर व इतरांनी मार्गदर्शन केले.

स्मार्ट सिटीत मोठा घोटाळा

उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी या कामाची पाहणी केली आहे. या कामांमुळे पणजीकरांची मोठ्या प्रमाणात सतावणूक करण्यात आली. राजधानीची ही अवस्था होण्यास सर्वस्वी भाजप सरकार जबाबदार आहे. स्मार्ट सिटी हा मोठा घोटाळा असल्याचे अमित पालेकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com