मडगाव नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सणासुदिला बोनस न मिळाल्याने कामावर बहिष्कार टाकला आहे. आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. सणासुदीच्या दिवसात बोनस मिळायला हवा आणि जोवर ही मागणी पूर्ण होत नाही तोवर संपावर जाण्याचा निर्णय मडगाव पालिका कर्मचारी संघटनेने घेतला आहे. कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने बुधवारी मडगाव नगरपरिषदेचे ( एमएमसी ) मुख्याधिकारी अग्नेलो फर्नांडिस यांच्याशी घेतलेल्या बैठकीत हा निर्णय झाला.
शिरोडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मडगाव नगरपरिषदेचे (MMC) अध्यक्ष लिंडन परेरा यांची भेट घेऊन सणासुदीला बोनस न देण्याच्या मुद्द्यावर चर्चा केली. त्यानंतर परेरा यांनी फर्नांडिस यांना त्यांच्या केबिनमध्ये बोलावले. तेव्हा शिरोडकर यांची मुख्य अधिकाऱ्याशी जोरदार चर्चा झाल्याचे समजते. या समस्येचे स्पष्टीकरण देताना, फर्नांडिस यांनी पत्रकारांना सांगितले की, "जेव्हा त्यांना अध्यक्षांच्या केबिनमध्ये बोलावण्यात आले तेव्हा शिरोडकर यांनी मागणी करत विचारले की ते कर्मचार्यांना गुरुवारपर्यंत बोनस देणार आहेत का?
त्यावेळी शिरोडकर यांना समजावून सांगण्यात आले की, पालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे आणि त्यांच्याकडे इतर महत्त्वाचे काम आहेत जसे की कर्मचाऱ्यांना मासिक पगार, ड्रेस भत्ता, सेवानिवृत्तीचे फायदे, मृत्यूचे फायदे इ. त्यामध्ये बोनस ही बाब नाही. मात्र पालिकेची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर बोनस पेमेंट केले जाईल. असे फर्नांडीय यांच्या कडून शिरोडकर यांना सांगण्यात आले.
दरम्यान शिरोडकर यांच्या गुरुवारपासून कर्मचाऱ्यांच्या संपावर जाण्याच्या धमकीला उत्तर देताना “कर्मचाऱ्यांना संपावर जायचे असेल तर त्यांना किमान सात दिवसांची नोटीस द्यावी लागेल.” असेही फर्नांडीस म्हणाले होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.