Goa Covid Updates Dainik Gomantak
गोवा

बुस्टर डोस न घेतलेल्या दोघांचा कोरोनामुळे मृत्यू

चिंता वाढली : एक रुग्ण अधिकच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल

दैनिक गोमन्तक

पणजी: ‘कोविड - 19’चा संसर्ग पुन्हा राज्यात वाढत आहे. लसीकरणामुळे कोरोनाची लागण होऊनसुद्धा अधिकच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची वेळ खूप अत्यल्प रुग्णांवर येत असतानाच रविवारी कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य प्रशासनाने दिली .

(Both died of corona without taking booster dose in goa)

कोरोनामुळे आज गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये दोघांचा मृत्यू झाला. यातील 75 वर्षीय रुग्ण मधुमेह, किडनी आणि इतर आजारांनी त्रस्त होते. तर 70 वर्षीय पुरुष रुग्ण लठ्ठपणा आणि इतर रोगांनी आजारी होते. गंभीर बाब म्हणजे या दोघांनीही कोरोनाचा बूस्टर डोस घेतलेला नव्हता. दरम्यान, आज 950 संशयितांच्या चाचण्या केल्या असता नव्याने 112 रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

आतापर्यंत 3,835 रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. यात आज दोन रुग्णांची भर पडली आहे. सध्या राज्यात 928 सक्रीय रुग्ण आहेत.

राज्यात लसीकरणाचे प्रमाण मोठे असले तरी अद्यापही बुस्टर न घेणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. 60 वर्षांवरील आणि अन्य आजारांनी त्रस्त असलेले नागरिक बुस्टर डोस घेण्यासाठी पात्र आहेत. त्यांनी तातडीने बुस्टर डोस घेणे गरजेचे आहे. सध्यातरी कोरोनासाठी लसीकरणाला पर्याय नाही.

- डॉ. उत्कर्ष बेतोडकर, कृतिदलाचे सदस्य.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT