Borim Bridge Dainik Gomantak
गोवा

Borim Bridge: बोरी पूल दुरुस्ती सुरू! राशोल-शिरोडा फेरीवर वाढला ताण; वाहतूक कोंडीची समस्या

Borim Bridge Repair: बोरी पुलाच्या दुरुस्तीचे काम टप्प्याटप्प्याने सुरू केले आहे. या पुलाची दुरुस्ती आवश्यक होती. पण लोकांची सोय करून ती करायला हवी होती, असे लोकांचे म्हणणे आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: सार्वजनिक बांधकाम खात्याने बोरी पुलाच्या दुरुस्तीचे काम टप्प्याटप्प्याने सुरू केले आहे. या पुलाची दुरुस्ती आवश्यक होती. पण लोकांची सोय करून ती करायला हवी होती, असे लोकांचे म्हणणे आहे. बोरी पूल बंद झाल्याने राशोल-शिरोडा फेरी वरील ताण वाढला आहे त्यामुळे वाहतुकीची कोंडीचा सामना करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

बोरी पुलाची दुरुस्ती शनिवारपासून (ता.११) सुरू झाली. शनिवार व रविवार रात्री ८ ते सकाळी ८ पर्यंत हा पूल वाहतुकीस बंद करण्यात आला. त्यामुळे लोक रात्रीच्या वेळी म्हार्दोळ, कवळे, मंगेशी मधील मंदिरात पालखी किंवा इतर उत्सवासाठी गेले होते त्यांना रात्रीच्या वेळी येताना शिरोडा, सावर्डे, केपे मार्गे यावे लागले. काहींनी जुने गोवे, आगशी व जुवारी पुलावरुन यावे लागले. रविवारी सकाळी फोंडाहून भाजी, फळे किंवा इतर विक्री सामान घेउन पहाटे मडगावला येत होते त्यांना सुद्धा त्रास झाला.

पोलिसांची गरज

राशोल-शिरोडा फेरीवर ताण वाढला आहे. या फेरी मार्गावर केवळ दोनच फेरीबोटी आहेत. त्यामुळे लोकांना नदी पार करण्यासाठी अर्धा -पाऊण तास वाट पहावी लागत आहे. तसेच अरुंद रस्त्यावर वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. शिवाय फेरीबोटीचे वेळापत्रक सुद्धा निश्र्चित नाही. त्यातच वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस तैनात केलेले नाहीत.

यासंदर्भात, पिटर वाझ यांनी सांगितले की, या मार्गावर त्या वेळेत जास्त फेरीबोटीची व्यवस्था करायला हवी होती. शिवाय धक्क्यावर व धक्क्याच्या जरा पुढे पोलिस ठेवायला हवे होते, ही सर्व व्यवस्था करुनच पुलाच्या दुरुस्तीचे काम हातात घ्यायला हवे होते.

बोरी पूल खालील दिवशी असेल बंद

१८ व १९ ऑक्टोबर - रात्री १० ते सकाळी ६

२५ व २६ ऑक्टोबर - रात्री ८ ते सकाळी ८

१ व २ नोव्हेंबर- रात्री १० ते सकाळी ६

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: "त्याने करार नाकारलाय, पण..." क्रिकेटमधल्या दिग्गजानं केलं मोठं विधान; मेगा ऑक्शनपूर्वी 'विराट' सस्पेन्स कायम

India Job Creation: रोजगार निर्मितीचा महाविक्रम! 17 कोटी नवीन नोकऱ्यांची निर्मिती, बेरोजगारी दरात 50 टक्क्यांची ऐतिहासिक घट

Thivim Railway Accident: थिवीत रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू, कोकण रेल्वे पोलिसांकडून पुढील तपास सुरु; अपघाताचे गूढ कायम?

Goa Rain: हाय सायबा! दिवाळीपर्यंत पाऊस करणार मुक्काम; 2 दिवसांसाठी राज्यात 'Yellow Alert'

Goa Tourism: टॅक्सी, लॉजिंग, सीफूड झाले स्वस्त! GST कमी झाल्याने गोव्यात खिशाला परवडणाऱ्या पैशात करता येणार पर्यटन

SCROLL FOR NEXT