Borim Accident Dainik Gomantak
गोवा

Borim Accident: बोरी येथे भीषण अपघात! काँक्रिटवाहू ट्रकची कारला धडक, लहान मुलांसह 6 जण जखमी; तेलंगणातील कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Borim Accident 6 Injured: दक्षिण गोव्यातील बोरी येथे शनिवारी (6 ऑगस्ट) एका भीषण अपघातात काँक्रिटवाहू ट्रकने एका भरधाव वेगाने येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली.

Manish Jadhav

Borim Accident 6 Injured: दक्षिण गोव्यातील बोरी येथे शनिवारी (6 सप्टेंबर) सायंकाळी एका भीषण अपघातात काँक्रिटवाहू ट्रकने एका कारला जोरदार धडक दिली. सायंकाळी 4:10 वाजता घडलेल्या या घटनेत कारमधील सहा प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींमध्ये चार मुलांचा समावेश असून सर्वजण मूळचे तेलंगणाचे पण सध्या वर्का, मडगाव येथे राहत आहेत. या घटनेमुळे फोंडा-मडगाव मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएच-07 एन 1360 (MH-07 N 1360) क्रमांकाचा काँक्रिट मिक्सर ट्रक फोंडा बाजूकडून येत होता, तर टीएस-07 जीटी 5672 (TS-07 GT 5672) क्रमांकाची कार समोरुन येत होती. बोरी येथील एका वळणावर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने थेट कारला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, कारचा पुढील भाग पूर्णपणे चेपला गेला आणि त्यात बसलेले सर्व प्रवासी अडकले. कारचे मोठे नुकसान झाले.

जखमी प्रवाशांची माहिती

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने कारमधून जखमींना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु झाले. या अपघातात एकूण सहा जण जखमी झाले, ज्यात कार चालक रघुराम (वय 45) आणि पाच मुलांचा समावेश आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची नावे खालीलप्रमाणे:

  1. रघुराम, वय 45, वर्का, मडगाव (मूळ तेलंगणा) - कार चालक

  2. हैमा संविता, वय 12, वर्का, मडगाव (मूळ तेलंगणा)

  3. माया अक्षय देशपांडे, वय 39, वर्का, मडगाव (मूळ तेलंगणा)

  4. साई कृष्णा, वय 11, वर्का, मडगाव (मूळ तेलंगणा)

  5. अभिमा देशपांडे, वय 13, वर्का, मडगाव (मूळ तेलंगणा)

  6. सात्विक रेड्डी, वय 12, वर्का, मडगाव (मूळ तेलंगणा)

जखमींपैकी हैमा संविता, माया अक्षय देशपांडे आणि साई कृष्णा यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना अधिक उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. इतर जखमींवर प्राथमिक उपचार करुन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पोलिसांची कारवाई आणि वाहतुकीवर परिणाम

अपघातामुळे फोंडा-मडगाव महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. फोंडा वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला असून ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. चालकाविरुद्ध बेदरकारपणे वाहन चालवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून गोव्यात रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः अवजड वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे किंवा गंभीर दुखापती झाल्या आहेत. बोरी येथील हा रस्ता अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे आणि काही धोकादायक वळणांमुळे अपघात प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. प्रशासनाने या भागात वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे आणि अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी स्थानिकांनी पुन्हा एकदा केली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोलीत दिवाळीची लगबग; गावठी पोहे, आकाशकंदिलांची रेलचेल, कारीटेही दाखल; मिठाईची दुकानेही सजली

Tragic Death: संसर्गामुळे हृदय, श्वसनक्रिया पडली बंद; मडगावात 14 वर्षीय मुलाचा मृत्यू

Rohit Sharma: वीरेंद्र सेहवागचा 'तो' ऐतिहासिक विक्रम धोक्यात! ऑस्ट्रेलियात 'हिटमॅन' रोहित शर्माकडे इतिहास रचण्याची संधी

Goa Live Updates: नायजेरियन व्यक्तीकडून अमलीपदार्थ जप्त

Mayem Lake: मये तलावाला लवकरच येणार 'अच्छे दिन', जोडरस्त्याच्या कामाचा प्रारंभ; नोव्हेंबरपासून पर्यटनाला चालना

SCROLL FOR NEXT