Borim: गजेश नाईक दोन पिढ्यांपासून बनवतात घुमट, शामेळ; गणेशचतुर्थीत आरती पथकांकडून वाद्यांना मोठी मागणी

Borim Ganpati festival instruments: गणपती उत्सवात गावागावात घुमट आरत्या केल्या जातात. यासाठी घुमट, शामेळ, कासाळे, झांज ही महत्त्वाची वाद्ये खरेदी करण्याकडे आरती मंडळांचा अधिक ओढा असतो.
Ganpati festival instruments
Ganpati festival instrumentsDainik Gomantak
Published on
Updated on

बोरी: गणपती उत्सवात गावागावात घुमट आरत्या केल्या जातात. यासाठी घुमट, शामेळ, कासाळे, झांज ही महत्त्वाची वाद्ये खरेदी करण्याकडे आरती मंडळांचा अधिक ओढा असतो. ही वाद्ये काही मोजक्याच ठिकाणी विक्रीस उपलब्ध असल्याने लोकांना ती बेळगाव, पंढरपूर, कोल्हापूर सारख्या भागात जाऊन आणावी लागत होती; परंतु बायथाखोल-बोरी येथील हमरस्त्याला लागून असलेल्या श्रद्धा म्युझिकल हाऊसमध्ये गजेश गोपाळ नाईक हे आरती पथकांसाठी उपलब्ध करून देत आहेत.

कासवाडा-तळावली येथील गजेश गोपाळ नाईक हे गेल्या १५ वर्षांपासून आपला वडिलोपार्जित व्यवसाय करून लोकांच्या आरती साहित्याच्या गरजा पूर्ण करत आहेत. पूर्वी त्यांचे वडील कै. गोपाळ नाईक हे कासवाडा-तळावली येथे आपल्या घरी घुमट, शामेळ बनवून विक्री करत होते व राज्याच्या विविध भागातून लोक त्यांच्याकडून हे साहित्य खरेदी करण्यासाठी येत होते; परंतु वडिलांच्या निधनानंतरही गजेश नाईक यांनी घुमट आरती साहित्याच्या विक्रीचा आपला पारंपरिक व्यवसाय सुरूच ठेवलेला आहे.

Ganpati festival instruments
Goa News: बांदोडा येथील बूथ क्रमांक २३ मधील सर्व ११९ मतदार हे सनातन आश्रमचे साधक, वाचा दिवसभरातील घडामोडी

शामेळ, घुमट, कासाळे, झांज आदी साहित्य ते बेळगाव, कोल्हापूर, भागातून खरेदी करून आणतात. पूर्वी घुमटांना घोरपडीची कातडी वापरली जायची; परंतु आता घोरपडी मारण्यास बंदी असल्याने आणि घोरपडींची कातडी उपलब्ध नसल्याने तबला, डग्यासाठी बकऱ्याची कातडी वापरली जाते. ही बकऱ्याची कातडी कोल्हापूर, बेळगावसारख्या भागातून खरेदी करून आणली जाते.

घुमट, शामेळांची करतात आस्थापनात विक्री

गजेश नाईक हे स्वतः घुमट, शामेळ बनवतात. तसेच जुन्या नादुरुस्त घुमट, शामेळींना चामडे घालूनही देतात. बोरी-बायथाखोल येथील त्यांच्या आस्थापनात विविध आकाराचे लहान-मोठे घुमट व शामेळ विक्रीस उपलब्ध आहेत.

Ganpati festival instruments
Goa healthcare policy: महागडे उपचार आता सर्वांसाठी परवडणार; दुर्मिळ आजारांवरील औषधांसाठी राज्यात 'अभिनव किंमत' धोरण राबवण्याची सरकारची घोषणा

तसेच छोट्या मुलांसाठी अत्यंत छोटे घुमटही त्यांच्याकडे मिळतात. ते आपल्या ग्राहकांना माफक दराने हे साहित्य उपलब्ध करून देतात म्हणून त्यांच्या दुकानात गर्दी असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com