दोडामार्ग-नाकाबंदी आदी व्यवस्थेची पाहणी करताना मामलेदार पंडित. Dainik Gomantak
गोवा

Goa: 'डेल्टा प्लस'मुळे दोडामार्ग येथे 'नाकाबंदी' कडक

गोव्याबाहेरून आलेल्या 17 जणांची रॅपिड अँटीजन (RAT) चाचणी करण्यात आली.

दैनिक गोमन्तक

डिचोली: 'डेल्टा प्लस' विषाणूच्या पार्श्वभूमीवर रॅपिड अँटीजन चाचणीसह डिचोली तालुक्याला जोडणाऱ्या दोडामार्ग सीमा तपासणी नाक्यावर कडक 'नाकाबंदी' करण्यात आली आहे. कालपासून या सीमा नाक्यावर प्रयोगशाळा स्थापन करून रॅपिड अँटीजन चाचणी करण्याची मोहीम सुरु झाली असून, शनिवारी (ता. 26) दोडामार्ग येथे सतरा प्रवाशांची 'कोविड' चाचणी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, डिचोलीचे मामलेदार प्रवीणजय पंडित हे दोडामार्ग तपासणी नाक्यावरील व्यवस्था आणि परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही तशी सूचना मामलेदारांना केली आहे.

17 जणांची चाचणी नकारात्मक

शनिवारी दिवसभरात दोडामार्ग सीमा तपासणी नाक्यावर सीमेबाहेरून आलेल्या 17 जणांची रॅपिड अँटीजन चाचणी करण्यात आली. या 17 ही जणांचे अहवाल नकारात्मक आले आहेत. अशी माहिती मामलेदार श्री. पंडित यांच्याकडून मिळाली आहे. चाचणीच्या शुल्कापोटी 4 हजार 400 रूपये जमा करण्यात आले आहे. सीमेबाहेरून येणाऱ्या ज्या प्रवाशांजवळ 'कोविड' निगेटिव्ह प्रमाणपत्र नाही त्यांना रॅपिड अँटीजन चाचणी सक्तीची करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT