Bordem Dainik Gomantak
गोवा

Bordem: बोर्डे भागात पाणीप्रश्‍न! जलवाहिनी फुटून पाणी गेले वाहून; गृहिणींची गैरसोय

Bordem Water Problem: शहरातील बोर्डे येथे नव्याने घालण्यात आलेली जलवाहिनी अचानक फुटल्याने पाण्याची प्रचंड प्रमाणात नासाडी झाली.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: शहरातील बोर्डे येथे नव्याने घालण्यात आलेली जलवाहिनी अचानक फुटल्याने पाण्याची प्रचंड प्रमाणात नासाडी झाली. मध्यरात्री ते सकाळीपर्यंत मिळून फुटलेल्या जलवाहिनीतून हजारो लिटर पाणी वाया गेले. फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करेपर्यंत बोर्डे परिसरात मोठी पाणी टंचाई निर्माण झाली होती.

शुक्रवारी दुपारपर्यंत जलवाहिनी दुरुस्त केल्यानंतर बोर्डे भागातील घरगुती नळांना दुपारनंतर पाणी आले. तोपर्यंत मध्यरात्रीपासून जवळपास बारा तास घरगुती नळ कोरडे राहिले होते. बारा तासांच्या प्रतीक्षेनंतर नळांना पाणी आल्याने विशेष करून गृहिणींचा जीव एकदाचा भांड्यात पडला.

बोर्डे भागात सध्या नवीन जलवाहिनी घालण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. काल (गुरुवारी) सायंकाळी बोर्डे वडाजवळील जलवाहिनीचे काम पूर्ण झाले होते. मात्र काल मध्यरात्री बोर्डे येथील सरकारी शाळेसमोरील जंक्शनवरील जलवाहिनीमध्ये बिघाड निर्माण होऊन पाणी बाहेर वाहू लागले. आज सकाळी तर पाणी घसघसून वाहत होते.

जॉईंट सुटल्याने उद्‍भवली समस्या

मिळालेल्या माहितीनुसार जलवाहिनीचा जॉईंट सुटल्याने ही समस्या निर्माण झाली होती. सार्वजनिक बांधकाम खात्याला या प्रकाराची माहिती मिळताच संबंधितांनी बोर्डे परिसरातील पाणी पुरवठा करून त्वरित दुरुस्तीकाम हाती घेतले. तोपर्यंत बोर्डे परिसरातील पाणी पुरवठा पूर्णपणे ठप्प होऊन नळ कोरडे पडले होते. . गृहिणींना तर पाण्यासाठी धावपळ करावी लागली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 2026: शनिदेवांच्या लाडक्या राशीवर होणार धनाचा वर्षाव! शुक्राच्या साथीनं चमकणार नशीब; नोकरीत बढती अन् व्यापारात दुप्पट नफा

मानवजातीच्या विनाशाची नवी वेळ निश्चित! 100 कोटी वर्षांनंतर सजीव सृष्टीचा होणार 'द एंड'; नासाच्या सुपरकॉम्प्युटरचा थरारक अंदाज

एलपीजी सिलेंडर की पीएनजी? स्मार्ट किचनसाठी निवडा योग्य पर्याय; स्टोरेजच्या कटकटीपासून ते बुकिंगच्या वेटिंगपर्यंत सिलेंडरची 5 आव्हाने

Global Terrorist Amir Hamza Attack: लाहोरमध्ये रक्ताचा सडा! हाफिज सईदचा विश्वासू आमीर हमजावर खूनी हल्ला; अज्ञात हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Goa IPL Betting Racket Busted: 6 जणांना बेड्या, 50 एटीएम कार्ड अन् 10 लाखांचा मुद्देमाल जप्त; गोव्यात सट्टेबाजीचं रॅकेट उद्ध्वस्त; सांगोल्ड्यात मध्यरात्री पोलिसांचा छापा

SCROLL FOR NEXT