Goa Congress Dainik Gomantak
गोवा

ना हेल्मेट, ना नियमांचे पालन; CM च्या वाढदिवस सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल, काँग्रेस आक्रमक

मुख्यमंत्र्यांच्या वाहनासमोर हेल्मेट न घालता भाजपचे झेंडे घेऊन दुचाकी चालविणाऱ्यांचा व्हिडीओ समोर आला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या वाढदिवशी निघालेल्या मिरवणुकीत पोलिसांच्या उपस्थितीत मोटार वाहन नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात आले. गोव्याचे पोलीस महासंचालक दखल घेऊन सर्व उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करतील का? असा सवाल काँग्रेसचे सोशल मीडिया प्रभारी दिव्या कुमार यांनी केला.

मुख्यमंत्र्यांच्या वाहनासमोर हेल्मेट न घालता भाजपचे झेंडे घेऊन दुचाकी चालविणाऱ्यांचा व्हिडीओ समोर आला आहे. काँग्रेसच्या समाजमाध्यम विभागाने भाजपवर लोकांचे जीव धोक्यात आणल्याचा आरोप केला आहे.

'केरी समुद्रात बुडून चार निष्पाप जीव गेले. तरीही असंवेदनशील भाजप सरकारने सर्व नितीमुल्ये पायदळी ठेवत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा वाढदिवस साजरा केला. इतरांना प्रवचन देणारे वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करतील का?' असा सवाल दिव्या कुमार यांनी करुन त्यांनी उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना या उल्लंघनाची दखल घेण्याचे आवाहन केले आहे.

तसेच, लोकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या भाजपच्या या मुर्खपणावर भाजपचे प्रवक्ते रुपेश कामत, सिद्धार्थ कुंकळ्ळीकर, गिरीराज पै वेर्णेकर, शर्मद रायतूरकर, दत्तप्रसाद नाईक, साव्हियो रॉड्रिग्स आता तोंड उघडतील का? असा सवाल समाजमाध्यम संयोजक सोहन शेणई यांनी केला.

हेल्मेट न घालता दुचाकीस्वारांना नियम तोडण्यास प्रोत्साहन देणे भाजपची असंवेदनशीलता उघड करते. भाजपचे लक्ष केवळ कार्यक्रम आणि उत्सवांवर केंद्रित आहे असे सांगून कॉंग्रेसचे युवा नेते रोहन नाईक यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे सोशल मीडिया प्रभारी अमित मालवीय यांना प्रश्न केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Katrina Kaif Baby Boy: आई-बाबा झाले कतरिना कैफ- विकी कौशल! लग्नाच्या 4 वर्षांनी चिमुकल्याचे आगमन, PHOTO पोस्ट करत दिली माहिती

BJP X INC Goa: काँग्रेस विद्यार्थी संघटनेने दामू नाईकांसाठी बुक केली मानसोपचारतज्ज्ञांची अपॉइंटमेंट

Ranji Trophy 2025: रजत पाटीदारला रोखण्यासाठी 'मास्टरप्लॅन'! गोवा संघात खास गोलंदाजाची एन्ट्री, फलंदाजाची धाकधूक वाढली

Goa Today's News Live: साळगाव खून प्रकरण; संशयितांना लवकरच अटक केली जाईल, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Water Metro Goa: ‘वॉटर मेट्रो’साठी पुढचे पाऊल! अभ्यास पथकाची 28 ठिकाणी भेट; अहवाल पाठवणार पुढे

SCROLL FOR NEXT