bondla wildlife sanctuary : बोंडला अभयारण्यात विविध प्राणी आणून तेथे अभयारण्य सफर सुरू करावी, जेणेकरून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल, अशी सूचना आमदार मायकल लोबो यांनी केली.
अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलताना लोबो म्हणाले की, सर्वसामान्यांचे हित पाहून मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. सर्व क्षेत्रांना त्यांनी न्याय दिला आहे. आपल्या मतदारसंघातील कांदोळी आरोग्यकेंद्रासाठी त्यांनी दहा कोटी रुपये मंजूर केले.
‘स्वयंपूर्ण गोवा आणि आत्मनिर्भर भारत’ ही योजना प्रत्यक्षात आणताना मुख्यमंत्र्यांनी मागील अर्थसंकल्पात दिलेली आश्वासने पूर्ण केली. कळंगुट मतदारसंघातील किनारी भागात मलनि:स्सारण वाहिनी टाकण्यासाठी संबंधित खात्यास आर्थिक तरतूद करण्यास सांगितले आहे.
राज्यात अधिकाधिक उद्योग यावेत यासाठी ‘एक खिडकी’ योजना सुरू करावी. उद्योग आल्यानंतर येथील युवकांना रोजगार मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
एलईडीद्वारे मासेमारी सुरूच
राज्यातील गोशाळांना देण्यात येणारा मदतनिधी वाढविणे गरजेचे आहे. मोकाट जनावरांना पकडून त्यांची रवानगी गोशाळेत करावी. शिवाय २४ तास सेवा देणारी प्राणी रुग्णवाहिका (ॲनिमल ॲम्ब्युलन्स) सुरू करावी.
मासेमारी व्यवसायात युवापिढी येऊ पाहत नाही. महाराष्ट्र व कर्नाटकातील मच्छीमार गोव्याच्या सीमा भागात एलईडीद्वारे मासेमारी करतात. ती बंद करणे काळाची गरज आहे.
गोवा फॉरवर्डचा मंत्री असताना एलईडी मासेमारीवर बंदी आणणारा कायदा करण्यात आला होता. पण आता पुन्हा ही बेकायदा मासेमारी सुरू आहे. त्यामुळे कायदा असूनही तो पाळला जात नसल्याकडे लोबो यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
राज्य सरकारने चालविलेल्या विविध कल्याणकारी योजनांची रक्कम महिन्याच्या १ तारखेला संबंधितांच्या खात्यावर जमा व्हायला हवी. राज्यातील दोन-तीन सहकारी सोसायट्यांनी कोट्यवधी रुपये खाल्ले. त्यामुळे अनेकांची रक्कम अडून पडली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यात लक्ष घालावे.
- मायकल लोबो, कळंगुटचे आमदार
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.